काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की आपण पेस्ट्री, आईस्क्रीम, बर्फी, जलेबी, गुलाब जामून असे पदार्थ खातो. परंतु, खीर या पदार्थाला सण किंवा विशेष प्रसंगी पसंती दिली जाते. खीर अनेक प्रकारची केली जाते. पण आपण कधी तांदळाची खीर खाऊन पाहिली आहे का? गोड पदार्थांमध्ये तांदळाची खीर फार फेमस आहे.
तांदूळ, सुकामेवा, साखर, दुधापासून ही खीर तयार केली जाते. आज आपण २ चमचे तांदळापासून खीर तयार करणार आहोत. कमी साहित्यात - कमी वेळात तयार होणारी ही खीर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. आपण ही खीर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासोबत गोड पदार्थ म्हणून देखील खाऊ शकता. आपल्याला जर काहीतरी गोड व पौष्टीक खाण्याची इच्छा झाली असेल तर, तांदळाची झटपट खीर नक्की ट्राय करून पाहा(Kheer Recipe, How to Make Rice Kheer).
तांदळाची इन्स्टंट खीर करण्यासाठी लागणारं साहित्य
तांदूळ
दूध
वेलची
दही कधी आंबट-कडसर तर कधी पातळ होते? ४ सोप्या टिप्स, दही लागेल गोडसर-घट्ट
तूप
मिल्क पावडर
साखर
सुका मेवा
कृती
सर्वप्रथम, एका मिक्सरच्या भांड्यात २ चमचे तांदूळ घ्या, त्यात २ ते ३ मोठी वेलची घालून पावडर तयार करा. एका भांड्यात एक चमचा तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. तूप वितळल्यानंतर त्यात तांदळाची पावडर घालून भाजून घ्या. २ मिनिटांसाठी तांदळाची पावडर भाजून घेतल्यानंतर त्यात अर्धा लिटर दूध घालून मिक्स करा.
साऊथ इंडियन लालेलाल चविष्ट ‘अल्लम चटणी’ आता करा घरी, डोशाची वाढेल रंगत..चव अशी की वाह!
दुधाला सतत ढवळत राहा. लो फ्लेमवर १० मिनिटे शिजवून घ्या. आता त्यात साखर, २ चमचे मिल्क पावडर, बारीक चिरलेला सुका मेवा घालून मिक्स करा. ५ मिनिटे खीर लो फ्लेमवर चांगली शिजवून घ्या. अशा प्रकारे खीर खाण्यासाठी रेडी. आपण ही खीर गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करून देखील खाऊ शकता.