Lokmat Sakhi >Food > हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?

हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?

Khichadi Map of India: खिचडी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ.. तुम्हीही खिचडीचे चाहते असाल, तर हे काही खिचडीचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 06:41 PM2022-10-17T18:41:17+5:302022-10-17T18:45:41+5:30

Khichadi Map of India: खिचडी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ.. तुम्हीही खिचडीचे चाहते असाल, तर हे काही खिचडीचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजेच.

Khichadi Map of India: If you are khichadi lover, then you must know following types of khichadi | हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?

हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?

Highlightsहा मॅप बघा आणि तो व्यवस्थित लक्षात ठेवा. भविष्यात पर्यटनासाठी, कामासाठी या काही प्रांतात गेलात, तर तिथे जाऊन कोणती खिचडी खायची, हे आताच नोट डाऊन करून ठेवा. 

रात्रीच्या जेवणात गरमागरम खिचडी, त्यावर मस्त चमचाभर साजूक तूप, तोंडी लावायला लाेणचं आणि भाजलेला पापड आणि सोबत एखादा सार किंवा मग कढी... असा बेत असेल तर मग त्या जेवणाची चव आणि रंगत काही वेगळीच. खिचडी लव्हर्सच्या (khichadi lovers) भाषेत सांगायचं झालं तर अगदी पंचपक्वान्नाच्या किंवा मग पंचतारांकित हॉटेलमधील जेवणालाही अशा मस्त खिचडीची सर येणार नाही. खिचडीचे जर असे शौकिन असाल तर मग @thebetterindia यांच्यावतीने प्रसिद्ध केलेला हा खिचडी मॅप (Khichadi Map of India) तुम्ही एकदा बघायलाच हवा.

 

मसाला खिचडी, साधी खिचडी, गुजराथी खिचडी, आसट खिचडी असे खिचडीचे काही प्रकार आपल्याला माहिती असतात आणि आपण ते घरी बनवतही असतो. याशिवाय साबुदाणा खिचडी, बाजरीची खिचडी असे प्रकारही आपण अधून मधून बनवतो.

गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी

पण या व्यतिरिक्तही खिचडी करण्याचे अनेक प्रकार आहेत, ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. भारतातल्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने खिचडी तयार करण्यात येते. तांदळासोबत खिचडीमध्ये टाकण्याचे पदार्थ आणि रेसिपी वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक प्रांतातल्या खिचडीचा स्वादही वेगवेगळा असतो. त्यामुळेच तर हा मॅप बघा आणि तो व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जर दिवाळीच्या सुटीनिमित्त बाहेर फिरायला जाण्याचा विचार असेल किंवा भविष्यात पर्यटनासाठी, कामासाठी या काही प्रांतात गेलात, तर तिथे जाऊन कोणती खिचडी खायची, हे आताच नोट डाऊन करून ठेवा. 

 

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनीही @thebetterindia यांची पोस्ट शेअर केली आहे.

एक चमचा दालचिनीची जादू! दिवाळीत चेहऱ्यावर चमक, मनात उत्साह हवा? करुन बघा हा झटपट उपाय

या खिचडीच्या नकाशामध्ये तब्बल ३५ पेक्षाही अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी दाखविण्यात आल्या आहेत. बघा तो नकाशा आणि सांगा नाव वाचून यापैकी कोणती खिचडी टेस्ट करायला तुम्हाला आवडेल किंवा तुम्ही कोणकोणत्या पद्धतीच्या खिचडी खाऊन बघितल्या आहेत..

 

Web Title: Khichadi Map of India: If you are khichadi lover, then you must know following types of khichadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.