Lokmat Sakhi >Food > Kitchen Tips : फक्त ५०० रूपयात किचन मेकओव्हर करा; नेहमी दिसेल स्टायलिश, मोकळं अन् स्वच्छ

Kitchen Tips : फक्त ५०० रूपयात किचन मेकओव्हर करा; नेहमी दिसेल स्टायलिश, मोकळं अन् स्वच्छ

Kitchen Care Tips : या पद्धतीनं नियोजन केल्यास आपल्या स्वयंपाकघरात एक चांगला बदल करता येईल आणि अधिक टापटिप दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 04:10 PM2021-07-25T16:10:03+5:302021-07-25T17:24:50+5:30

Kitchen Care Tips : या पद्धतीनं नियोजन केल्यास आपल्या स्वयंपाकघरात एक चांगला बदल करता येईल आणि अधिक टापटिप दिसेल.

Kitchen Care Tips : Under 500 rupees kitchen makeover ona budget | Kitchen Tips : फक्त ५०० रूपयात किचन मेकओव्हर करा; नेहमी दिसेल स्टायलिश, मोकळं अन् स्वच्छ

Kitchen Tips : फक्त ५०० रूपयात किचन मेकओव्हर करा; नेहमी दिसेल स्टायलिश, मोकळं अन् स्वच्छ

Highlightsजर स्वयंपाकघरात हुक्स लावत असाल तर वस्तू, कपडे ठेवायला मदत होऊ शकते. स्वयंपाकघरातील कपडे, ब्रशेस आणि इतर साफसफाईची सामग्री हँग करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.काही शेल्फ्स असे आहेत जे अगदी लहान जागेत अगदी सहज बसतात आणि त्यातील एक डोअर शेल्फ आहे.   ४०० रुपयांच्या बजेटमध्ये आपल्याला २ लेयर असलेले एक शेल्फ किंवा रॅक मिळू शकेल जे  कोणत्याही ठिकाणी सहज बसू शकेल.

आपलं स्वयंपाकघर हा घराचा एक महत्वाचा भाग असतो. रोज कितीही आवरलं, कितीही स्वच्छ केलं तरी किचन अस्वच्छ वाटतं. कधी कामाचा कंटाळा आला तर किचनमध्ये पाय ठेवूच नये असं बायकांन वाटतं. आपलं घर जसं आहे त्यात आपण त्याला सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त 500 रुपयात स्वयंपाकघराचा मेकओव्हर करता येऊ शकतो. स्वयंपाकघरचे स्वरूप अधिक व्यवस्थित, चांगलं बनवण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील.  या पद्धतीनं नियोजन केल्यास  आपल्या स्वयंपाकघरात एक चांगला बदल करता येईल आणि अधिक टापटिप दिसेल.

१) भिंतीवरचे रॅक्स

जर आपले बजेट 500 रुपये असेल तरी किचनचे मेकओव्हर केले जाऊ शकते. भिंतींवर वॉलपेपरर्सचा वापर केला जाऊ शकतो आणि प्लास्टिक्सचे रॅक स्वतंत्रपणे ठेवले जाऊ शकतात.

२) वॉल पेपर्स ऑर्गनायजर

एल्यूमीनियम फॉईलचा वापर जेवणाचा गरम ठेवण्यासाठी केला जातो. तेल बाहेर येण्यापासून रोखण्यासाठीही असा पेपर वापरला जातो. हाच पेपर तुमच्या संपूर्ण किचनचा मेकओव्हर करू शकतो. 350 रुपयांत आपल्या आवडीनुसार नो ऑइल सेल्फ स्टिक वॉलपेपर मिळू शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यावर ओलसरपणा किंवा तेलकटपणाचा काहीच परिणाम होत नाही. असे वॉल स्टिकर्स वेगवेगळ्या रंगात आणि वेगवेगळ्या डिझाइनसह उपलब्ध असतात. आपण आपल्या  आवडीनुसार हे वॉलपेपर्स सेट करू शकता. 

३) ऑर्गनायजर

हे कमीत कमी रुपयांत वॉलपेपरसह घेता येईल. आपण कोणतं ऑर्गनायजर घेऊ इच्छिता हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण वॉलपेपर वापरत असल्यास सिंकच्या आजूबाजूची जागा साबणामुळे खराब होऊ शकते. म्हणून सिंकच्या सभोवतालचे क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आपल्या बजेटमध्ये ऑर्गनायजर घेऊ शकता.

४) डोअर शेल्फ आणि हूक्स

काही शेल्फ्स असे आहेत जे अगदी लहानात लहान जागेत सहज बसतात आणि त्यातील एक डोअर शेल्फ आहे.   ४०० रुपयांच्या बजेटमध्ये आपल्याला २ लेयर असलेले एक शेल्फ किंवा रॅक मिळू शकेल जे  कोणत्याही ठिकाणी सहज बसू शकेल. त्यामध्ये केवळ बाटल्या, जारच ठेवता येणार नाहीत तर स्वयंपाकघरात वापरल्या जात असलेल्या इतर वस्तूही ठेवू शकता.  

जर स्वयंपाकघरात हुक्स लावत असाल तर वस्तू, कपडे ठेवायला मदत होऊ शकते. स्वयंपाकघरातील कपडे, ब्रशेस आणि इतर साफसफाईची सामग्री हँग करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. फक्त १०० ते २०० रूपयात स्वयंपाकघर रिडेकोरेट करण्यासाठी तुम्हाला हा पर्याय सहज उपलब्ध होईल.

५) ऑर्गनायजिंग स्टँण्ड्स

स्वयंपाकघरात  स्टँण्ड्स ठेवणं देखील फायद्याचं ठरू शकतं. प्लास्टीक किंवा काचेच्या मध्यम आकाराच्या बरण्या एखाद्या स्टॅण्डमध्ये ठेवून तुम्ही  जागा वाचवू शकता. २०० रूपयांच्या आत तुम्हाला या प्रकारच्या स्टॅण्डमध्ये खूप ऑप्शन्स मिळतील. 

Web Title: Kitchen Care Tips : Under 500 rupees kitchen makeover ona budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.