सिंकची स्वच्छता हे अवघड काम नाही. काही सोपे उपाय करुन सिंक स्वच्छ ठेवता येतं आणि घाणेरडा वासही घालवता येतो. तसेच आपल्याला स्वयंपाकघरात वावरताना प्रसन्न वाटेल अशा प्रकारे सिंक सुवासिकही करता येईल.
Image: Google
सिंक स्वच्छतेचे नियम
1. सिंकची स्वच्छता ठेवण्याचा पहिला नियम म्हणजे सिंकमधे अन्नपदार्थांचे कण अजिबात राहाता कामा नये. भांडे धुतांनाच भांड्यामधील खरकट काढून ते कचरा पेटीत टाकावं. भांडे धुतांना सिंकच्या छिद्रांच्या जवळपास खरकटं नाहीयेना हे बघावं.
2. रोज दिवसाच्या शेवटी सिंक लिक्विड सोप आणि घासणी यांचा वापर करुन स्वच्छ धुवावं.
3. सिंकच्या भांड्याला तेलाचा मेणचटपणा असेल तर खरकट्या पाण्याचा वास आणि रंग हा मेणचटपणा धरुन ठेवतो. त्यामुळे सिंकचं भांडं तेलकट तर दिसतंच शिवाय सिंकजवळ विचित्र वासही येतो. अशा वेळेस सिंक धुतांना गरम पाण्यात लिक्विड सोप घालून सिंक स्वच्छ करावं.
Image: Google
4. दर आठ दिवसांनी रात्री झोपण्याआधी सिंकमधे उकळतं पाणी घालावं. किंवा दर पंधरा दिवसंनी किवी ड्रेनेजची पावडर रात्री झोपण्याआधी घालावी.
5. रात्री जेवणाची भांडी स्वच्छ करायची नसतील तर किमान भांड्यामधील सर्व खरकट काढून भांड्यांमधे थोडं पाणी घालून ठेवावं. यामुळे सिंकला घाणेरडा वास येत नाही.
6. सिंकचं भांडं स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचाही उपयोग करता येतो. यासाठी एक मोठा चमचा बेकिंग सोडा घ्यावा. तो सिंकच्या भांड्यामधे पसरुन टाकावा. 5 -10 मिनिटानंतर घासणीनं सिंक घासून पाण्यानं धुवून घ्यावं. सिंकच्या भांड्याचा तेलकटपणा निघून जातो आणि खरकटा वासही राहात नाही.
Image: Google
7. एका उपायाद्वारे सिंकच्या भांड्याची दुर्गंधी तर जाईलच शिवाय सिंकजवळ गेल्यावर छान वासही येईल. यासाठी हिवाळ्यात संत्र्याच्या सालीचा आणि इतर वेळेस लिंबाच्या सालीचा उपयोग करावा. रात्री झोपताना सिंकच्या भांड्याला संत्र्याचं / लिंबाचं साल चोळावं. साल चोळल्यानंतर अर्ध्या तासानं सिंक पाण्यानं धुवून घ्यावं.
8. रात्री झोपण्याआधी सिंकच्या भांड्यात डांबर गोळी ठेवावी. सिंक वापरताना ती बाजूला काढून ठेवावी. सिंकचा वापर नसताना ती पुन्हा सिंकच्या भांड्यात ठेवावी.