हल्ली बऱ्याच मुलांना शाळेत दोन डबे न्यावे लागतात. त्यापैकी एक डबा असतो नाश्त्याचा आणि दुसरा असताे जेवणाचा. नाश्त्याच्या डब्यामध्ये कधीकधी नुसती फळं दिली तरी मुलं खुश होतात. आणि आईसाठीही ते जास्त सोयिस्कर ठरतं. पण मुलांना आवडत असूनही अनेक जणी त्यांना डब्यात सफरचंद देणं टाळतात (How to keep apple fresh for long?). याचं एकमेव कारण म्हणजे सफरचंद चिरल्यानंतर काही वेळातच ते लालसर, काळं पडतं. एक अख्खं सफरचंद डब्यात दिलं तर मुलं त्यातलं अर्ध टाकून देतात. त्यामुळे ते द्यायचंच असेल तर चिरूनच द्यावं लागतं. अशावेळी मग सफरचंद न दिलेलं बरं असं वाटणं साहजिक आहे. पण इथून पुढे सफरचंद द्यायचं असेल तर एकदा हा प्रयोग करून पाहा. यामुळे ते मुळीच काळं पडणार नाही. पुढे कित्येक तास अगदी फ्रेश राहील.(simple remedies to prevent apples from turning brown?)
सफरचंद लालसर, काळं पडू नये म्हणून उपाय
सफरचंद चिरल्यानंतर पुढे कितीतरी तास ते जसंच्या तसं फ्रेश राहावं, यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती cookwithrupamsehtya या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
काही केल्या डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं जातच नाहीत? ३ सोपे उपाय- ८ दिवसांत डार्क सर्कल्स गायब
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सगळ्यात आधी सफरचंदच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
त्यानंतर एका पसरट भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाका.
मीठ पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये सफरचंदच्या फोडी टाका आणि ५ मिनिटांसाठी तशाच राहू द्या.
त्यानंतर त्या फोडी मिठाच्या पाण्यातून काढून घ्या आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर एका कोरड्या कपड्याने पुसा आणि पुर्णपणे कोरड्या झाल्यानंतर डब्यात भरा. या फोडी ४ ते ५ तास अगदी फ्रेश राहतील.
हिवाळ्यात छोट्याशा कुंडीतही भरभरून येतील 'या' भाज्या; लावून तर पाहा- भाज्या विकत घेणंच विसराल
हा उपायही करू शकता
सफरचंद चिरल्यानंतर त्यावर थोडंसं लिंबू लावल्यानेही ते काळं, लालसर होत नाही.
सफरचंद उभं ठेवून त्याच्या फोडी करा. फक्त त्या फोडी एकमेकींपासून दूर करू नका. आता त्या फोडींना एक रबर लावून टाका. हा उपाय केल्याने सफरचंदाच्या फोडींचा हवेशी संपर्क येत नाही आणि त्यामुळे त्या लालसर, काळ्या होत नाहीत.