Lokmat Sakhi >Food > भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

Kitchen Hack : How To Make Perfect Round Shape Pakoda - Bhaji At Home : भजी, पकोडे, छोटे वडे बनवताना त्याचा शेप बिघडतो ? परफेक्ट एकसारखाच गोल आकार येत नाही... वापरून पहा ही झटपट ट्रिक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 11:07 AM2023-08-22T11:07:48+5:302023-08-22T11:27:39+5:30

Kitchen Hack : How To Make Perfect Round Shape Pakoda - Bhaji At Home : भजी, पकोडे, छोटे वडे बनवताना त्याचा शेप बिघडतो ? परफेक्ट एकसारखाच गोल आकार येत नाही... वापरून पहा ही झटपट ट्रिक..

Kitchen Hack : How To Make Perfect Round Shape Pakoda - Bhaji At Home. | भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

हिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू असे आहेत की, ज्याचा आनंद भजी खाल्ल्याशिवाय अपूर्णच राहतो. गरमागरम, कुरकुरीत, खमंग भजी पाहिली किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा यासारखं स्वर्गसुख देणारा कोणता पदार्थ असूच शकत नाही. 

भजी म्हटली की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर कांदा - बटाटा भजी, मुगाच्या डाळीची भजी, बेसन पिठाची भजी असे भजीचे असंख्य प्रकार येतात. असं म्हटलं जात कोणताही पदार्थ तोंडात टाकून खाण्याआधी, त्या पदार्थाकडे बघून आपण त्याचे वेगळेपण डोळ्यांत साठवत असतो. आपल्याकडील प्रत्येक पदार्थाला त्याची - त्याची अशी विशिष्ट ओळख आहे. प्रत्येक पदार्थाची चव, रंग, आकार, सुवास हे सगळं ठरलेलं असत. कुठल्याही पातळ बॅटरची भजी म्हटलं की, ती गोलाकार, खरपूस तळलेली, मसाले घालून छान लालसर रंग आलेली अशीच आपल्या डोळ्यांसमोर येते. या बॅटरमध्ये जर आपण कांदा, बटाटा किंवा इतर काही जिन्नस घातले तर त्यांचा आकार हा बदलतो. आपण घरी देखील काहीवेळा वेगवेगळ्या बॅटरपासून भजी किंवा छोटे पकोडे, वडे बनवतो. या भज्या, वडे परफेक्ट एकसारखेच गोल होण्यासाठी एका झटपट घरगुती ट्रिकचा उपयोग करून घेऊयात(Kitchen Hack : How To Make Perfect Round Shape Pakoda - Bhaji At Home).

भजी, वडे, पकोडे परफेक्ट गोलाकार होण्यासाठी झटपट ट्रिक... 

१. सर्वप्रथम भजीचे मध्यम कंन्सिस्टंन्सीचे बॅटर बनवून घ्यावे. 

२. भाजी, वडे, पकोडे यांचा परफेक्ट गोलाकार यावा यासाठी आपल्याला एक छोटा बाऊलभर पाणी, व एका चमच्याची गरज लागणार आहे. 

३. आता डाव्या हाताच्या मुठीत पुरेल इतके बॅटर घ्यावे. मूठ संपूर्णपणे बंद केल्यानंतर. अंगठा व पहिले बोट जिथे दुमडले आहे त्या भागांतून थोडेसे पीठ बाहेर येईल. अशावेळी चमचा पाण्यांत बुडवून हे हातांतून बाहेर आलेलं अतिरिक्त पीठ चमच्यावर काढून घ्यावे. त्यानंतर चमच्यात आलेल्या बॅटरची गोलाकार भजी तेलात तळण्यासाठी सोडून द्यावी. 

फक्त १० मिनिटांत फ्रिजमध्ये करून ठेवा ४ प्रकारची वाटणं, रोजचा स्वयंपाक होईल चमचमीत - झटपट...

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

कांदा - बटाटा न वापरता करा पारंपरिक गोळा भजी, भर पावसात झणझणीत मेजवानी...

४. चमच्याला असलेल्या पाण्यामुळे भजी लगेच तेलांत अलगद आहे त्या आकारात सोडली जाते. 

५. अशाप्रकारे प्रत्येक एक भजी तेलांत सोडण्यापूर्वी चमचा पाण्यांत बुडवून घ्यावा. जेणेकरून भजी तेलांत परफेक्ट गोलाकार आकारांत सोडली जाईल.

ही एक सोपी ट्रिक वापरून आपण परफेक्ट गोलाकार आकारात भजी बनवू शकतो.

करुन पाहा वांग्यांचं रायतं; वांग्याचं भरीत आणि वांग्याची कापं विसराल असा मस्त चमचमीत पदार्थ...

Web Title: Kitchen Hack : How To Make Perfect Round Shape Pakoda - Bhaji At Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.