Lokmat Sakhi >Food > Kitchen Hacks : ना साखरेला मुंग्या लागणार, ना दूध उतू जाणार; ८ किचन टिप्स, रोजचं काम होईल सोपं

Kitchen Hacks : ना साखरेला मुंग्या लागणार, ना दूध उतू जाणार; ८ किचन टिप्स, रोजचं काम होईल सोपं

Kitchen Hacks : केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी केळ्यांचा वरचा भाग चिकटपट्यांनी गुंडाळून ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:32 PM2023-01-12T12:32:49+5:302023-01-12T13:01:53+5:30

Kitchen Hacks : केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी केळ्यांचा वरचा भाग चिकटपट्यांनी गुंडाळून ठेवा

Kitchen Hacks : 8 Most useful kitchen hacks Useful Kitchen Hacks To Save Time In The Kitchen | Kitchen Hacks : ना साखरेला मुंग्या लागणार, ना दूध उतू जाणार; ८ किचन टिप्स, रोजचं काम होईल सोपं

Kitchen Hacks : ना साखरेला मुंग्या लागणार, ना दूध उतू जाणार; ८ किचन टिप्स, रोजचं काम होईल सोपं

रोजचं किचनचं काम करण्यात बराचवेळ जातो. कामाच्या गडबडीत कधी दूध उतू जातं तर कधी पोळ्या करपतात. अशावेळी काय करावं सुचत नाही. (Kitchen Hacks) काही सोपे किचन हॅक्स तुमच्या कामाचा वेळ वाचवू शकतात. (Cooking Hacks & Tips) यामुळे पैसे आणि वेळ दोन्हींची बचत होईल आणि तुमचं काम वाढणार नाही. (Useful Kitchen Hacks To Save Time In The Kitchen)  

काम सोपं करण्यासाठी हॅक्स

१) साखरेला मुंग्या येऊ नयेत म्हणून साखरेच्या डब्यात लवंग घालून ठेवा.

२) केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी केळ्यांचा वरचा भाग चिकटपट्यांनी गुंडाळून ठेवा, जेणेकरून केळी खराब होणार नाहीत.

३) कुकीज, बिस्कीट, साखरेपासून बनवलेली मिठाई कडक होऊ नये म्हणून  त्यात संत्र्याचे किंवा सफरचंदाचे साल घालून ठेवा. 

४)  सूप, भाज्यांवरचं जास्तीचं तेल काढून टाकण्यासाठी एका भांड्यात बर्फ घेऊन ते भांड सूप किंवा भाजीवरून फिरवा यामुळे जास्तीचं तेल भांड्याला चिकटून निघून जाईल. 

५) संत्री, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांची सालं काढणं म्हणजे खूपच किचकट काम. या फळांची सालं काढण्यासाठी फळ गुंडाळून मायक्रोव्हेवमध्ये ठेवा आणि गरम झाल्यानंतर  बाहेर काढून  त्याची सालं काढा.

६) चीझ किंवा बटर चांगलं किसलं जाण्यासाठी सगळ्यात आधी ते फ्रिजमध्ये ठेवा नंतर किसून घ्या. 

७) दूध उतू जाऊ नये म्हणून त्यावर लाकडाचा चमचा ठेवा. 

८) चपात्या काळ्या पडून नयेत म्हणून तेल लावून पीठ झाकून ठेवा.
 

Web Title: Kitchen Hacks : 8 Most useful kitchen hacks Useful Kitchen Hacks To Save Time In The Kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.