Join us  

लिंबाचा रस फ्रिजमध्ये कसा साठवून ठेवायचा? पाहा सोपी ट्रिक, उन्हाळ्यात लिंबू महाग झाले तरी नो टेंशन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 1:53 PM

Kitchen Hacks: Best Way To Store, Preserve & Keep Lemon Juice Fresh For Long : लिंबाचा रस साठवून ठेवायची आणि हवं तेव्हा लिंबू सरबत करण्याची सोपी ट्रिक.

अंगाची काहिली करणा-या ऊन्हाळ्यात उकाड्यामुळे घसा कोरडा पडतो. अशा वेळी ही कोरड घालवण्यासाठी, आलेला थकवा दूर करण्यासाठी गारेगार असे लिंबू सरबत प्यावे असे वाटते. कधी अचानक घरी पाहुणे आले, ऊन्हाळ्यांत शरीराला थंडावा मिळावा अशा अनेक कारणांसाठी आपण लिंबू सरबत नक्कीच बनवून पितो. आता हळुहळु ऊन्हाळा वाढत चालला आहे. ऊन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय करत असतो. उष्माघात टाळायचा असेल तर ऊन्हाळ्यात डिहायड्रेशन होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ऊन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी आपण शहाळ्याचे पाणी, लिंबूसरबत ,कोकम सरबत यांचे सेवन करतो. ज्यामुळे आपल्याला ऐन ऊन्हाळ्यांत शरीराला थंडावा मिळून फ्रेश राहता येते. ऊन्हाळ्यात चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिण्याचे अनेक चांगले फायदे होऊ शकतात.

बाजारांत कधी स्वस्त दरांत लिंब विकत मिळाली किंवा ऊन्हाळ्यांत लिंबू सरबत पिण्यासाठी आपण बाजारांतून एकदम लिंब विकत आणतो. विकत आणलेली लिंब खराब होऊ नयेत म्हणून आपण त्याचा रस काढून तो स्टोअर करुन फ्रिजमध्ये ठेवतो. लिंबाचा रस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्यानंतर त्यापासून ऊन्हाळ्यांत आपण झटपट लिंबू सरबत तयार करु शकतो. या स्टोअर केलेल्या लिंबाच्या रसापासून आपण फक्त ३ स्टेप्समध्ये झटपट लिंबू सरबत तयार करु शकतो. स्टोअर केलेल्या लिंबाच्या रसापासून झटपट होणारे लिंबू सरबत कसे तयार करता येईल ते पाहूयात(Kitchen Hacks: Best Way To Store, Preserve & Keep Lemon Juice Fresh For Long).

लिंबाचा रस नक्की कसा स्टोअर करुन ठेवावा... 

१. सर्वप्रथम सगळ्या लिंबांचा रस काढून घ्यावा. २. लिंबाचा रस काढताना एक मोठी गाळणी घेऊन त्यात लिंबू पिळून त्याचा रस काढावा. जेणेकरून लिंबांचा रस व लिंबांच्या बिया वेगळ्या राहतील. लिंबांचा रस काढताना त्यात बिया जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. ३. आता हा लिंबाचा रस चमच्याच्या मदतीने एका मोठ्या बर्फाच्या ट्रे मध्ये भरुन ठेवावा. 

४. त्यानंतर हे ट्रे फ्रिजरमध्ये ३ ते ४ तासांसाठी रेफ्रिजरेट करुन ठेवावेत. ५. काही काळानंतर लिंबाचा रस रेफ्रिजरेट होऊन त्याचे बर्फासारखे खडे तयार होतील. ६. आता हे लिंबाच्या रसाचे खडे ट्रे मधून बाहेर काढावेत व एका प्लॅस्टिक कंटेनर किंवा झिप लॉक बॅगमध्ये व्यवस्थित स्टोअर करुन परत फ्रिजमध्ये ठेवावेत. 

indian_food__katta या इंस्टाग्राम पेजवरून स्टोअर केलेल्या लिंबू रसापासून झटपट लिंबू सरबत कसे बनवावे यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.      

७. जेव्हा आपल्याला लिंबाचे सरबत करायचे असेल तेव्हा एका ग्लासमध्ये लिंबाच्या रसाचे २ खडे घालून, आपल्या आवडीनुसार त्यात मीठ, साखर, पाणी घालून चमच्याच्या मदतीने ढवळून झटपट लिंबाचे सरबत पिण्यासाठी सर्व्ह करावे.  ८. या स्टोअर केलेल्या लिंबांच्या रसाचा वापर आपण केवळ लिंबू सरबत बनविण्यासाठीच नाही तर इतर पदार्थ करताना त्यात लिंबाचा रस घालण्यासाठीदेखील या क्युब्सचा वापर करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृती