Join us  

Kitchen Hacks : कमीत कमी पदार्थांत स्वयंपाक होईल चवदार चविष्ट; ४ कुकींग टिप्स, जेवण बनेल उत्तम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 6:58 PM

Kitchen Hacks : या स्वयंपाकाच्या टिप्स फॉलो केल्या त्यामुळे पटकन तयार होणारे अन्नही अतिशय चविष्ट होईल.  

रोजची स्वयंपाकघरातली कामं करताना ती पटपट करण्याच्या टिप्स माहीत असतील तर काम लवकर होण्यास मदत होईल. काहीवेळा अन्न घाईत तयार केले जाते की त्याला चव नसते. (Cooking Hacks & Tips) पण जर तुम्ही या स्वयंपाकाच्या टिप्स फॉलो केल्या त्यामुळे पटकन तयार होणारे अन्नही अतिशय चविष्ट होईल. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या किचन टिप्स आहेत ज्यामुळे तुमचा स्वयंपाक करणे सोपे होईल. (Tips for tasty food cooking)

फोडणी देताना ही पद्धत वापरा

जर तुम्ही रोज साधी डाळ बनवत असाल तर फोडणीची डाळ बनवा तेव्हढाच चेंज वाटेल. जर तुम्ही रोजच फोडणीची डाळ बनवत असाल तर फोडणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती माहीत करून घ्या. कढईत फोडणी देताना जिरे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडा गरम मसाला टाकून तळून घ्या. नंतर यामध्ये उकडलेली डाळ घाला. यामुळे डाळीची चव दुप्पट होईल आणि सर्वांनाच आवडेल.

नेहमीच जेवणात मीठ जास्त होतं?

जर तुमच्या जेवणात मीठ जास्त पडत असेल तर लक्षात ठेवा मीठ शेवटी घाला. भाजी शिजल्यावर किंवा डाळ शिजल्यावर शेवटी मीठ टाकल्यास जास्त मीठ लागत नाही आणि चवही वाढते.

खीर बनवा हेल्दी

खीर शिजवताना त्यात साखर टाकली जाते. पण जर तुम्हाला हेल्दी खीर बनवायची असेल तर गोडपणासाठी खीरमध्ये गुळाचे तुकडे टाका. यामुळे खीरची चवही वाढेल आणि ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. त्यामुळे जर तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर गुळासोबत खीर बनवा आणि आरामात सर्व्ह करा. हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

बेसन संपलं असेल तर...

घरातील बेसन संपले आणि भजी बनवायच्या असतील तर बाजारात धावण्याची गरज नाही. घरी असलेली हरभऱ्याची डाळ ग्राइंडरमध्ये बारीक करून पीठ लवकर तयार करता येते. आणि वेळ असल्यास हरभरा डाळ अर्धा तास भिजत घालावी. नंतर त्यांना बारीक करून मिश्रण बनवा. खूप चविष्ट झाल्यावर तयार होईल. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न