Lokmat Sakhi >Food > kitchen hacks for cooking : कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणारच नाही, ४ टिप्स कांदा चिरा सरसर

kitchen hacks for cooking : कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणारच नाही, ४ टिप्स कांदा चिरा सरसर

Kitchen hacks for cooking : डोळ्यात पाणी न आणता कांदा चिरण्याची युनिक टेक्निक! या पद्धतीनं सरासर कांदा चिरा, डोळेही राहतील चांगले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 01:12 PM2022-02-22T13:12:48+5:302022-02-22T13:32:06+5:30

Kitchen hacks for cooking : डोळ्यात पाणी न आणता कांदा चिरण्याची युनिक टेक्निक! या पद्धतीनं सरासर कांदा चिरा, डोळेही राहतील चांगले

kitchen hacks for cooking : CookingTricks Best tips cut onion without tears | kitchen hacks for cooking : कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणारच नाही, ४ टिप्स कांदा चिरा सरसर

kitchen hacks for cooking : कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणारच नाही, ४ टिप्स कांदा चिरा सरसर

कांदा खाताना जितका रुचकर लागतो तितकाच तो कापताना रडवतो. मात्र, भाजीची चव वाढवण्यासाठी कांद्या घालणं अत्यंत महत्त्वाचे आहे.  कांद्यामध्ये आढळणाऱ्या एन्झाईम्समुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं. (Cooking Tricks Best tips cut onion without tears) पण आता कांदा कापताना रडावे लागणार नाही. कारण आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगत आहोत. ज्या टिप्स वापरून  तुम्ही कांदा कापला तर डोळ्यातून जराही पाणी येणार नाही.  (kitchen hacks Best tips  for cut onion without tears)

कांदा कापण्यापूर्वी 2 तास फ्रीजरमध्ये ठेवा

तुम्ही कांदा कापण्यापूर्वी काही वेळ व्हिनेगरमध्ये टाकलात तर कापताना तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. याशिवाय कांदा कापण्यापूर्वी २ ते ३ तास ​​फ्रीझरमध्ये ठेवा. वास्तविक, या प्रक्रियेदरम्यान, कांद्यापासून मुक्त होणारे एन्झाइम कमी प्रमाणात बाहेर पडतील. अशा स्थितीत कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येणार नाहीत.

'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कॅन्सरचा धोका; ब्लड टाईपनुसार ओळखा तुम्हाला कोणता गंभीर आजार उद्भवू शकतो

कांदावरुन नाही तर मुळाच्या बाजूने कापा

कांदा कापताना लक्षात ठेवा की तो वरच्या भागातून नाही तर मुळाच्या बाजूने कापावा. कांदा कापण्यासाठी धारदार चाकू वापरा जेणेकरून कांदा लवकर कापता येईल. असे केल्याने तुमच्या डोळ्यांतून पाणी कमी प्रमाणात बाहेर येईल.

कांदा कापताना लिंबाचा वापर

लिंबू, सहसा प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतात.  लिंबू कांदे कापताना खूप उपयुक्त ठरतो. तुम्ही ज्या सुरीने कांदा कापत आहात त्यावर थोडासा लिंबाचा रस लावा. असे केल्याने डोळ्यातून अश्रू येणार नाहीत. याशिवाय कांदा चिरताना शिट्टी वाजवली तर डोळ्यातून पाणी येणार नाही. कारण शिट्टी वाजवताना तुमच्या तोंडातून हवा बाहेर पडते. जे एन्झाइम तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही.

इतर पद्धती

कांदा कापताना तुम्ही मेणबत्ती किंवा दिवा लावा. असे केल्याने कांद्यामधून निघणारा वायू मेणबत्ती किंवा दिव्याकडे जाईल आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. याशिवाय कांदे कापताना ब्रेडचा तुकडा तोंडात ठेवून तो चघळला तरी डोळ्यांत पाणी येत नाही.  रिपोर्ट्सनुसार, कांदा हवा किंवा सूर्यप्रकाशात थोडा वेळ ठेवा. असे केल्यानं  कांदा कापताना डोळ्यांना कमी त्रास होतो. 

Web Title: kitchen hacks for cooking : CookingTricks Best tips cut onion without tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.