डोसा (Dosa) हा साऊथ इंडियन पदार्थ असला तरी भारत भरातील लोकांचा आवडता नाश्ता आहे. अनेकांना नाश्त्याला डोसा खायला फार आवडतं. (How to make perfect dosa) क्रिस्पी मसालेदार डोसा तर कोणाला मऊसूत डोसाा खायला खूप आवडतं. डोसा हा एक लो कॅलरीयुक्त हेल्दी पदार्थ आहे. (Dosa Making Tips) पण मार्केटसारखा डोसा घरी बनत नाही अशी तक्रार बऱ्याच महिलांची असते. अनेकजण लोखंडाच्या तव्यावर डोसा करतात. ज्यावर डोसा चिकटतो आणि व्यवस्थित निघत नाही. (What should I do if a dosa is sticking to a pan)
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून सोप्या टिप्स
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून सगळ्यात आधी तव्यावर अर्धा चमचा मीठ घाला. कांद्याच्या साहाय्याने हे मीठ पूर्ण तव्यावर लावून घ्या. त्यानंतर डोश्याचं पीठ तव्यावर घालून डोसा पसरवून घ्या. एका बाजूने शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने शिजवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वरून बटर किंवा तेल लावू शकता.
१) जर तुम्ही लोखंडाच्या तव्यावर डोसा बनवत असाल तर सगळ्यात आधी तवा व्यवस्थित स्वच्छ करा. तव्यावर तेलाचा चिकटपणा नसेल याची काळजी घ्या.
२) आता गॅस कमी करून तवा गरम करा. त्यात १ चमचा तेल घाला. नंतर तव्यातून हलका धूर बाहेर यायला लागल्यानंतर गॅस बंद करा.
३) डोसा लोखंडाच्या तव्यावरही तसाच बनेल जसा नॉनस्टिक तव्यावर बनतो.
४) आता तवा पूर्णपणे थंड होऊ द्या. डोसा बनवताना मंद आचेवर तेल गरम करून गॅस कमी करा.
५) आता संपूर्ण तेल टिश्यू पेपर किंवा ओल्या कापडानं पुसून स्वच्छ करा.
६) तव्यावर काही थेंब पाणी शिंपडा. नंतर तवा डोसा बनवण्यासाठी तयार असेल.
७) जर तुम्हाला डोसा उलथण्यात प्रोब्लेम येत असेल तर ज्या चमच्याने तुम्ही डोसा पलटत आहात तो चमचा पाण्यात बुडवा आणि मग डोश्यावर वापरा. यामुळे सहज डोसा उलटा करता येईल.
८) तुम्ही चिरलेलला अर्धा कांदा तेलात बुडवून तव्यावर लावू शकता. यामुळे डोसा क्रिस्पी होईल.
९) तरीही डोसा तव्याला चिटकत असेल तर कोरडं पीठ लावून तवा पुसून घ्या.
१०) जर तुम्ही नॉन स्टिक तव्यावर डोसा बनवत असाल तर एकदा तवा गरम करून घ्या. नंतर तवा थंड करून त्यावर डोश्याचं बॅटर घाला. यामुळे डोसा एकदम पातळ आणि क्रिस्पी बनेल.