Join us  

Kitchen Hacks : कांदा, लसणाशिवाय बनवा घट्ट, चविष्ट ग्रेव्ही; 4 ट्रिक्स, कमी साहित्यात स्वयंपाक होईल चवदार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 1:31 PM

Kitchen Hacks :

(Image Credit- slurrp, caterbay)

जेव्हाही ग्रेव्हीची मसालेदार भाजी बनवण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक गृहिणीला प्रथम आपल्या स्वयंपाकघरात कांदे आणि टोमॅटो दिसू लागतात. पण अनेकवेळा असे घडते की घरातील कांदे संपतात किंवा उपवासाच्यावेळेस काही लोक कांदा लसूण खाणं टाळतात. (How To Make Thick Vegetable Gravy Without Using Onion & Garlic) अशा स्थितीत तुम्हाला कोणतीही मसालेदार भाजी करायची असेल तर तुम्ही या गोष्टींची मदत घेऊ शकता. कांद्याशिवाय किचनमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांनी मसालेदार भाज्यांची ग्रेव्हीही घट्ट होऊ शकते.  जाणून घेऊया काय आहे ते साहित्य. (How To Make No-Onion, No-Garlic Gravy)

1) दही आणि फ्रेश क्रिम

जर घरातील दही किंवा क्रिम असेल तर याचा वापर तुम्ही भाजीत करू शकता. या दोघांच्या मदतीने रस्साही घट्ट होईल आणि तुमच्या भाजीलाही चांगले टेक्चर मिळेल. दही आणि दोन चमचे फ्रेश क्रीम फेटून घ्या. नंतर भाजीत घाला. मग भाजीची ग्रेव्ही घट्ट झालेली दिसेल.

सकाळी नाश्ता बनवताना खूपच घाई होते? 5 ट्रिक्स वापरा, पटकन तयार होईल चविष्ट नाश्ता

2) काजूची पेस्ट

जर कांदा संपला असेल तर तुम्ही काजू घालून ग्रेव्ही घट्ट करू शकता. शाही पनीरमध्ये काजू पेस्ट ग्रेव्ही घातली जाते. ही ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो शिजवून घ्या, नंतर काजू तळून पेस्ट बनवा. हवंतर प्रथम काजू तुपात भाजून घ्या. नंतर त्याची पेस्ट तयार करा असे केल्याने भाजीची चव वाढते.

3) शेंगदाणे

तुमच्या स्वयंपाकघरात काजू नसेल तर  तर शेंगदाण्यापासूनही ग्रेव्ही बनवता येईल. शेंगदाणा ग्रेव्ही देखील चवीला भरपूर चविष्ट आणि घट्ट होईल. शेंगदाणे कोरडे भाजून त्याची साल काढून पेस्ट बनवा. नंतर भाजी करण्यासाठी वापरा. किंवा कमी वेळात जेवण बनवण्यासाठी तुम्ही दाण्याचं कुट वापरू शकता. 

पावसाळ्यात चहात घालाच या 5 पैकी 1 तरी मसाला, गरमागरम चहाची चव दुपटीने वाढेल

4) मावा

काजू, शेंगदाणे उपलब्ध नसल्यास तुम्ही भाजी तयार करताना मावासुद्धा वापरू शकता. दुधापासून तयार झालेला मावा वापरल्यास कांदा न घातला ग्रेव्ही घट्ट होईल. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआरोग्य