आपल्यापैकी अनेकांना साउथ इंडियन पदार्थ खायला आवडतात. सुट्टीच्या दिवशी अनेकांच्या घरात मेदू वडा, इडली , डोसा आणि सांबार यांसारखे पदार्थ हमखास बनवले जातात.(South Indian Dosa Pan Tips) परंतु, अण्णासारखा परफेक्ट डोसा बनत नाही. कधी बॅटरचे प्रमाण चुकते तर कधी डोसा तव्याला चिकटून बसतो. यामुळे आपण डोसा बनवण्याच्या फंद्यात पडत नाही. (How to Prevent Dosa from Sticking)
डोसा बनला तरी तो कुरकुरीत किंवा रेस्टॉरंटसारखी चव त्याला येत नाही.(Perfect Dosa without Sticking) जर आपलाही डोसा बनवताना चुकत असेल, परफेक्ट बनत नसेल तर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्या. ज्यामुळे आपला डोसा एकदम नीट आणि व्यवस्थित बनेल. (Dosa Making Hacks for Beginners)
बेसन पीठ न वापरता करा कुरकुरीत -खुसखुशीत कोथिंबीर वडी, पहा रेसिपी- खा मनसोक्त परफेक्ट वड्या
डोसा बनवताना प्रमाण
डोसा बनवण्यासाठी पीठ किंवा मिश्रणाचे प्रमाण योग्य असायला हवे. फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ कधीही डिरेक्ट डोसा बनवण्यासाठी वापरु नका. फ्रीजमधले पीठ नॉर्मल होण्यासाठी ठेवा. डोसा बनवताना पीठ खूप जाड किंवा पातळ नसायला हवे. मिश्रणाचे प्रमाण योग्य नसेल तर डोसा चांगला बनत नाही. डोसा अधिक कुरकुरीत किंवा टेस्टी बनवायचा असेल तर त्यात पोहे घालू शकतो.
डोसा तवा
आपण नॉन-स्टिक किंवा लोखंडी तव्यावर डोसा बनवतो. आपण जर लोखंडी तव्यावर डोसा बनवला तर तो चिकटू शकतो. डोसा लोखंडी तव्याला चिकटू नये यासाठी तवा गरम करुन त्यावर तेल पसरवून घ्या. पॅन थंड झाल्यानंतर स्वच्छ कापडाने तेल काढून टाका. डोसा तव्याला चिकटू नये म्हणून कांदा चिरुन तेल लावलेल्या तव्यावर घासू शकता. यामुळे डोसा तव्याला चिकटणार नाही ना,जळेल.
कारली खाताना मुले नाक मुरडतात? ६ सोपे उपाय, कडू कारली घरातले आवडीने खातील
हे करुन पाहा
डोसा बनवण्यासाठी पॅन गरम करा.त्यावर थोडे पाणी शिंपडा जेणेकरुन पॅन जास्त गरम होणार नाही. जर पॅन खूप गरम असेल तर डोसा व्यवस्थित होणार नाही. यासाठी डोसा पीठ तव्यावर ओता आणि गोल आकारात पसरवून घ्या. तेल घालून चांगले पसरवून घ्या, सोनेरी झाल्यावर दुसऱ्या बाजूने शिजवा.