Lokmat Sakhi >Food > महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

Easy Storage Tips : How To Store Dried fruits (Nuts) For Long Time In Rainy Season : पावसाळयात सुकामेवा सादळून मऊ पडतो किंवा खराब होतो असे होऊ नये म्हणून खास युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 02:51 PM2023-07-14T14:51:51+5:302023-08-02T14:54:52+5:30

Easy Storage Tips : How To Store Dried fruits (Nuts) For Long Time In Rainy Season : पावसाळयात सुकामेवा सादळून मऊ पडतो किंवा खराब होतो असे होऊ नये म्हणून खास युक्ती...

Kitchen Hacks : Store Dry Fruits In This Way To Keep Them Fresh And Tasty For Years. | महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या डाएटमध्ये सुकामेवा खाणे पसंत करतो. रोजच्या डाएटमध्ये सुक्या मेव्याला समाविष्ट केल्यास त्याचे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. सुकामेवा हा महाग असल्यामुळे आपण तो खूप विचार करूनच खरेदी करतो. बरेचदा आपण सुकामेवा खरेदी करताना तो एकदाच घाऊक किमतीत खरेदी करणे पसंत करतो. सुकामेवा घाऊक किमतीत खरेदी केल्याने तो किमतीच्या मानाने स्वस्तही पडतो व पुरवठ्यालाही येतो. परंतु सुकामेवा असा घाऊक किमतीत खरेदी केल्यामुळे तो साठवून ठेवताना व्यवस्थित स्टोअर करून ठेवावा लागतो. असे न केल्यास त्यात छोट्या अळ्या किंवा किड लागू शकते किंवा बुरशी लागून तो खराब होऊ शकतो. 

पावसाळ्यात अशा साठवणीच्या पदार्थांना स्टोअर करून ठेवण्याचा मुख्य प्रश्न उद्भवतो. बहुतेकदा पावसाळयात वातावरणातील आर्द्रतेमुळे व ओलाव्यामुळे बरेचसे साठवणीचे पदार्थ खराब होतात. एवढेच नव्हे तर पावसाळ्यात हे साठवणीचे पदार्थ काहीवेळा मऊ पडून सादळतात. पदार्थातील कुरकुरीतपणा जाऊन  असे सादळलेले पदार्थ खाण्यात मजा येत नाही. आपण साठवून ठेवलेला सुकामेवा जसे की, काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड हे देखील ऋतूनुसार मऊ पडतात. असे होऊ नये यासाठी पावसाळ्यात सुकामेवा स्टोअर करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवूयात(Easy Storage Tips : How To Store Dried fruits (Nuts) For Long Time In Rainy Season).

१. सुकामेवा किती दिवस चांगला टिकू शकतो ?

प्रत्येक सुकामेव्याचा टिकण्याचा कालावधी हा निरनिराळा असतो. मात्र सर्वसाधारणपणे घरात सामान्य वातावरणात आणि हवाबंद डब्यात सुकामेवा सहा महिने टिकून ठेवता येतो. फ्रिजमध्ये आपण सुकामेवा जवळजवळ एक वर्ष टिकवून ठेवू शकता तर डीप फ्रिजरमध्ये तो एक ते दोन वर्ष व्यवस्थित टिकू शकतो. मात्र फ्रिज किंवा डीप फ्रिजरमध्ये  सुकामेवा साठवून ठेवताना तो छोट्या छोट्या हवाबंद पिशव्या किंवा डब्यांमध्ये साठवून  ठेवावा. ज्यामुळे त्याचा वापर करण्यासाठी प्रत्येकवेळी सर्वच सुकामेवा आपल्याला फ्रिजबाहेर काढावा लागणार नाही. 

पावसाळ्यात सुकामेवा सादळू नये म्हणून काही सोप्या टिप्स... 

१. सुकामेवा नेहमी ताजाच खरेदी करावा :- जेव्हा आपण सुकामेवा खरेदी कराल तेव्हा एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा. सुकामेवा खरेदी करताना आपल्याला  फ्रेश आणि ताजाच सुकामेवा खरेदी करायचा आहे. कारण जर आपण आधीच सुकलेला किंवा मऊ व जुना झालेला सुकामेवा खरेदी केला तर तो जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे जर सुकामेवा फ्रेश नसेल तर तो जास्त प्रमाणात खरेदी न करता गरजेपुरताच खरेदी करावा. पण जेव्हा आपण सुकामेवा साठवून ठेवण्यासाठी खरेदी  कराल तेव्हा तो फ्रेश आणि चांगल्या गुणवत्तेचा असेल याची काळजी घ्यावी.

भेंडी हिरवीगार ताजी राहावी म्हणून ४ सोप्या टिप्स, फ्रिजमध्ये ठेवून भेंडी काळी पडणार नाही-सुकणार नाही...

२. हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा :- हवेच्या संपर्कात आल्यामुळे कोणतीही गोष्ट नक्कीच खराब होऊ शकते. यासाठीच आपण बाजारातून आणलेला सुकामेवा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. सुकामेवा डब्यांत स्टोअर करून ठेवताना सुकामेव्याचे सर्व प्रकार निरनिराळ्या बरण्यांमध्ये भरून ठेवा. एकाच बरणीत सर्व प्रकारचा सुकामेवा ठेवू नका. कारण  जर एक प्रकार खराब झाला तर त्यामुळे सर्वच सुकामेवा खराब होण्याची शक्यता वाढते.

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

३. थंड आणि कोरड्या जागी स्टोअर करा :- स्वयंपाकघरात सुकामेवा स्टोअर करताना या गोष्टीसुद्धा अतिशय काटेकोरपणे लक्षात ठेवायला हव्यात. फ्रिजमध्ये  मध्ये किंवा थंड ठिकाणी सुकामेवा स्टोअर करून ठेवल्याने तो लवकर खराब होत नाही. मात्र जर आपण अतिशय उबदार किंवा उष्ण असलेल्या ठिकाणी, ओलसर ठिकाणी किंवा अती उष्ण जागी सुकामेवा ठेवला तर त्याला किड किंवा बुरशी लागण्याची शक्यता निर्माण होते. 

महागडे टोमॅटो विकत आणलेत ? लवकर खराब होऊ नयेत म्हणून १ खास टिप...

४. रोस्ट करून स्टोअर करा :- आपण सुकामेवा जास्त काळ टिकवण्यासाठी ते तव्यावर थोडे रोस्ट करून मग स्टोअर करू शकता. ज्यामुळे त्यांना किड लागणार नाही आणि ते जास्त दिवस टिकू शकतील. आपण ते टेस्टी करण्यासाठी त्यांना खारवून म्हणजेच मीठ लावून मग ते रोस्ट करून टिकवून ठेवू शकता. ज्यामुळे ते टेस्टी होतील आणि जास्त दिवस टिकतील.

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

Web Title: Kitchen Hacks : Store Dry Fruits In This Way To Keep Them Fresh And Tasty For Years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.