हिवाळ्यात बाजारात (Winter Vegetables) गेल्यावर विविध प्रकारचे भाज्या मिळतात (Green Vegetables). हिरव्या पालेभाज्या आणि फ्लॉवर जास्त प्रमाणात मिळतात (Kitchen Tips). बाजारात फ्रेश पालेभाज्या आणि फ्लॉवर दिसल्यावर आपण चटकन विकत घेतो. आपण घरी विकत घेऊन येतो. नंतर डायरेक्ट फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु, कधी कधी या भाज्या स्वच्छ करताना काही मोजक्या भाज्यांमध्येच आपल्याला किड किंवा छोट्या अळ्या दिसतात (Social Viral). या किड्या भाज्यांमध्ये तशाच राहिल्या, की भाज्या आणखीन खराब होतात. बऱ्याचदा कोबी, फ्लॉवर आणि पालेभाज्यांमध्ये कीड तशीच राहते. ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते.
अशावेळी या भाज्यांमध्ये लपलेली किड कशी काढून टाकावी हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच. यासाठी भाज्यांमध्ये लपून राहिलेली किड काढून टाकण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. यामुळे मिनिटात भाज्यांमधून कीड काढणं सोपं होईल. फ्लॉवरमधून कीड काढण्यासाठी कोणत्या टिप्स उपयुक्त ठरतील? पाहूयात(Kitchen Hacks To Remove Worms And Insects From Cauliflower).
युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन
फ्लॉवरमधील कीड काढण्यासाठी टिप्स
पाण्यात भाज्या भिजत ठेवा
बहुतांश भाज्यांमधून कीड बाहेर पडतात. पण काही भाज्यांमध्ये कीड लपलेला असतात. पण नीट धुतल्यानंतरही कीड बाहेर निघत नाही. यासाठी भाजी किंवा फ्लॉवरचे तुकडे करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. नंतर त्यात मीठ घाला. या पाण्यात फ्लॉवर १० मिनिटं भिजत ठेवा. यामुळे फ्लॉवर किंवा भाज्यांमध्ये अडकलेले सर्व किडे सहज बाहेर येतील. नंतर स्वच्छ पाण्याने भाज्या धुवून घ्या.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
मीठ आणि हळद
भाज्यांमध्ये अडकलेली कीड काढण्यासाठी मीठ आणि हळदीचा वापर करून पाहा. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात चिरलेला फ्लॉवर आणि भाज्या घाला. १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. नंतर त्यात मीठ आणि हळद घाला. नंतर १० मिनिटांसाठी भिजत ठेवा. यामुळे फ्लॉवर आणि भाज्यातील कीड निघून जातील.