Join us  

भात- खिचडी झटपट शिजवली पण कुकरचे झाकण लवकर कसे उघडायचे? २ टिप्स, पटकन जाईल वाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2023 12:28 PM

How to release pressure from pressure cooker: असं खूपदा होतं, सपाटून भूक लागलेली असते. पण वाफ न गेल्यामुळे कुकरचं झाकण पडतच नाही. त्यामुळे मग भात- खिचडी चटकन खाताच येत नाही.

ठळक मुद्देकुकरची वाफ पटकन जाण्यासाठी अनेक जण शिट्टी वर ओढतात आणि वाफ काढून टाकतात. पण त्यामुळे बऱ्याचदा भात किंवा खिचडी कच्ची राहते.

भात- खिचडी हे अनेकांच्या आवडीचे पदार्थ. वाफाळत्या भातावर किंवा खिचडीवर तुपाचा गोळा आणि सोबत तोंडी लावायला चटकदार लोणचं, असा बेत असला की दुसरं काही लागत नाही. रात्रीच्या जेवणातही अनेक जण हा बेत करतात. अशावेळी खूप भूक लागलेली असते. म्हणून आपण चटकन कुकर लावतो. भात- खिचडीही शिजते. पण नेमकं कुकरची वाफ पटकन जात नाही आणि मग कुकरचं झाकण उघडत नाही. पोटात तर अक्षरश: कावळे ओरडत असतात. भात किंवा खिचडीच्या सुगंधाने तर आणखीनच भूक खवळते. पण अशावेळी कुकरचं झाकण पडेपर्यंत हातावर हात ठेवून बसण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नसतो. म्हणूनच कुकरची वाफ पटकन जाण्यासाठी आणि झाकण उघडण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा. How to release pressure from pressure cooker

 

कुकरची वाफ जाऊन झाकण चटकन उघडण्यासाठी २ उपाय

१. बऱ्याचदा असंही होतं की घरातल्या सगळ्यांना गरमागरम भात खायचा असतो. त्यामुळे अगदी जेवण सुरू होण्याच्या आधी आपण कुकर लावतो. भात शेवटी खायचा असल्याने तो जेवण होईपर्यंत शिजेल, असा आपला अंदाज असतो.

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

आपल्या अंदाजानुसार भात शिजतोही. पण वाफ न गेल्यामुळे कुकरचं झाकण मात्र पडत नाही. अशावेळी गॅस बंद केल्यानंतर कुकर तसाच गॅसवर ठेवू नका. तो गॅसवरून खाली उतरवून थंड फरशीवर पंख्याखाली ठेवा आणि पंख्याचा स्पीड वाढवा.

 

२. कुकरची वाफ पटकन जाण्यासाठी अनेक जण शिट्टी वर ओढतात आणि वाफ काढून टाकतात. पण त्यामुळे बऱ्याचदा भात किंवा खिचडी कच्ची राहते.

पुरण शिजवताना शिट्टी होताच कुकरमधून पाणी फसफसत बाहेर येतं? २ टिप्स- डाळही शिजेल मऊ

त्यामुळे अशावेळी करता येण्यासारखा दुसरा आणखी एक साेपा उपाय म्हणजे कुकरच्या शिट्टीवर एखादा कप भरून थंड पाणी टाका. असे केल्यानेही पटकन वाफ निघून जाईल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स