Join us  

Kitchen Tips : ....म्हणून फ्रिजमध्ये ठेवूनही कोथिंबीर एका दिवसात खराब होते; फ्रेश कोथिंबीरीसाठी या घ्या ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 1:04 PM

Kitchen Tips : तुम्ही बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर ती जास्त काळ ताजी राहावी अशी तुमची इच्छा असेल. तर काही लहान लहान चुका टाळायला हव्यात.

आजकाल कोथिंबीरीचे भाव खूप महागलेत. पण काहीही झालं तरी कोथिंबीरीच्या पानांशिवाय आपलं जेवण अपूर्ण राहतं हेच खरं. चटण्या, वाटण, नाष्ता, भाजीवरील सजावट अशा अनेक पदार्थांचे पान कोथिंबीरीशिवाय हलत नाही. अशा स्थितीत जर तुम्ही बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर जास्त काळ ताजी राहावी अशी तुमची इच्छा असेल. तर काही लहान लहान चुका टाळायला हव्यात. प्रत्येक वस्तू टिकवून ठेवण्याच्या काही पद्धती असतात त्या समजून घ्यायला हव्यात. (How to make coriander leaves last longer).

१) कोथिंबीर न धुता साठवणं

या चुकीमुळे कोथिंबीर लवकर खराब होते. ही झटपट धुण्यायोग्य औषधी वनस्पती आहे आणि तुम्ही ती कोणत्याही प्रकारे साठवून ठेवल्यानंतर ती खराब होईल. पंख्याखाली किंवा उन्हात धुऊन सुकवण्याचा प्रयत्न केला तरी कोथिंबीर एका दिवसात सुकते. अन्यथा ओलाव्यामुळे कुजते आणि वास येऊ लागतो. कोथिंबीर कोरडी साठवून ठेवणे केव्हाही उत्तम, म्हणून धुवून लगेच डब्ब्यात बंद करू नका. 

२) देठं कापून साठवा

कोथिंबीरीचे देठ कापून साठवले पाहिजेत कारण कोथिंबीरच्या पानांच्या देठांमध्ये कधीकधी ओलावा असतो आणि हे पानं सडण्यास कारणीभूत ठरू शकते. कोथिंबिरीची मुळे आणि देठ साठवणे हा तो साठवण्याचा योग्य मार्ग आहे, जो दीर्घकाळ ताजे ठेवण्यास मदत करू शकतो.

३) फ्रिजमध्ये मोकळी ठेवणं

फ्रिजमध्ये डब्यात न ठेवता अशीच कागदात कोथिंबीर ठेवली तर  काही तासातच कोथिंबीर खराब होऊ शकते. इतकंच नाही तर त्याचा वासही कमी होऊ शकतो. धुवून सुकवून एका डब्यात कोथिंबीर ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहील. 

४) एअर टाईट डब्याचा वापर

जर कोथिंबीर 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ ताजी ठेवायची असेल, तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की ते हवाबंद डब्यात साठवा आणि फक्त कागदात गुंडाळा. अशीच मोकळी ठेवू नका. कोथिंबीर साठवण्याचा हा योग्य मार्ग आहे, यामुळे कोथिंबीर जास्त काळ चांगली राहते आणि खराब होत नाही.

५) डब्याला ओलावा असू नये

कोथिंबीर साठवताना महिलांकडून आणखी एक चूक केली जाते ती म्हणजे ते डब्यात साठवताना ओलाव्याची काळजी घेत नाहीत. जर  डबा स्वच्छ ठेवला नाही, तर त्यातील थोडासा ओलावा कोथिंबीर कमी वेळात खराब करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.