कोणत्याही भाजीची चव मसाले आणि फोडणी घालण्याच्या पद्धतीवर अवलंबू असते. अनेकदा भाजी बनवताना चुकीच्या पद्धतीने मसाले घातले तर भाजी चविष्ट लागत नाही. (Kitchen Tips) भाजीची खरी चव ही त्यातल्या मसाल्यांतून येते. या लेखात आम्ही तुम्हाला भाज्या बनवताना प्रथम पॅनमध्ये काय ठेवावे आणि मसाले कसे वापरावे हे सांगणार आहोत. समजून घेऊया स्वयंपाकाची लज्जत वाढवणाऱ्या ५ टिप्स (5 proper ways to add spices in vegetable)
सगळ्यात आधी हे काम करा
कोणतीही भाजी शिजवण्यापूर्वी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल चांगले तापले की त्यात जिरे, मोहरी किंवा तमालपत्र टाका. यानंतर तुम्ही आले आणि लसूण पेस्ट घालू शकता. दरम्यान तेल जास्त गरम नसल्याची खात्री करा. अनेकदा तेल जास्त गरम असेल तर जीरं, मोहोरी जळते त्यामुळे भाजीला खराब वास येतो आणि चवही बिघडते.
बिर्याणीसाठी योग्य तांदूळ कसा निवडाल? ५ ट्रिक्स वापरा, बिर्याणी बनेल परफेक्ट, रूचकर
ग्रेव्हीची भाजी बनवताना ही ट्रिक वापरा
कांद्याची ग्रेव्ही तयार करताना कांदा तळायला अर्धा तास लागतो असे अनेकवेळा पाहायला मिळते. पण कांद्यामध्ये चिमूटभर मीठ आणि हळद घातल्यास कांदा काही वेळात चांगला तळला जातो. कांद्यामध्ये टोमॅटो मिसळण्याची चूक करू नका.
स्वयंपाक करताना कुकरचा करा स्मार्ट वापर, ५ सोप्या युक्त्या- गॅस आणि वेळ दोन्हीची बचत
कापलेल्या भाज्या कधी घालायच्या?
आधी भाज्या घालून लगेच मीठ, हळद आणि मसाला घालणाऱ्या अनेक महिला आहेत, पण तसे करणे टाळावे. कांदा, टोमॅटो आणि भाज्या थोड्या शिजल्यानंतर मसाले घाला, नंतर भाजी झाकून ठेवा आणि थोडा वेळ शिजू द्या. झाकण ठेवलं नाही तर जास्त गॅस वाया जाईल आणि भाजी पटकन शिजणार नाही.
गरम मसाला कधी घालायचा?
गरम मसाला इतर मसाल्यांमध्ये मिसळणे टाळा. गॅस बंद करण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे आधी गरम मसाला घाला. जर तुम्ही गरम मसाला पावडर वापरत असाल तर तुम्ही ते इतर मसाल्यांसोबत घालू शकता.
१) भाजीत काळी मिरी घालायची असेल तर पावडर वापरून पाहा.
२) जर तुम्ही लवंगा वापरत असाल तर तुम्ही अख्ख्या घालू शकता.
३) मसाला तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीमध्ये मसाला शिजवा.
४) स्वयंपाकात कोथिंबीर आणि कसुरी मेथीचा वापर करा.