स्वयंपाक घरातील कोणत्याही प्रकारचे भांडी ठेवण्यासाठी किचनमधली मांडणी हा उत्तम पर्याय आहे. मांडणीमध्ये आपण ताट, वाटी, चमचा अशा सगळ्यात रोज लागणाऱ्या वस्तू ठेवू शकता. पण मांडणी स्वच्छ करायची म्हटलं की टेंशन येतं. नेहमी साफ सफाई करताना वरच्यावर भांड्यांची मांडणी स्वच्छ केली जाते पण पूर्णपणे स्वच्छ करता येत नाही.
कधीकधी जास्त उंचीवर असल्याने मांडणी व्यवस्थित साफ केली जात नाही. म्हणून रॅकवर हात पोहोचण्यासाठी आपल्याला शिडीची गरज लागते. काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही भितींवरून स्टँड न काढताच भांडी स्वच्छ करून शकता.
अशी करा सुरूवात
भांड्यांचा स्टँड स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जास्त साफसफाईचं सामान लागणार नाही. पण थोडीशी तयारी करावी लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी एक एक करून सगळी भांडी काढून घ्या. मग मांडणी स्वच्छ करा. जर मांडणी जास्त उंचावर असेल तर भांडी काढण्यासाठी स्टूल किंवा खुर्चीचा वापर करा. खुर्चीवर चढताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या.
गंज काढा
पाणी लागल्यानं भांड्याच्या मांडणीला गंज लागतो. मांडणीवरील गंज काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी गरम पाण्यात २ चमचे अमोनिया घालून मिश्रण तयार करून घ्या हे मिश्रण तयार केल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि ृ रॅकच्या चारही बाजूंना शिंपडा. काहीवेळ असंच राहू द्या २० मिनिटांनी ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीनं रगडून मांडणी स्वच्छ करा. या मिश्रणानं भांड्यांचा रॅक स्वच्छ केल्यानंतर साध्या पाण्यानंही मांडणी स्वच्छ करा.
आतल्या भागांची स्वच्छता
अनेकदा आपण वर वर दिसणारा रॅकचा भाग स्वच्छ करतो पण आतमध्ये धूळ, जळमटं तशीच राहतात. खूपदा स्त्रिया रॅकच्या आतील भाग स्वच्छ करायला विसरतात. त्यामुळे ही चूक तुम्हीही करू नका. तयार मिश्रण आतल्या सर्व भागांमध्ये टाका आणि सुमारे 10-15 मिनिटे सोडा. 15 मिनिटांनंतर पाण्याचा वापर करून स्वच्छ करून घ्या. त्यामुळे आतला भागही चमकेल.
बेकिंग सोडा
गरम पाणी आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण तयार करायला सोपं आहे. मांडणी साफ करण्यासाठी या पाण्याचा वापर होईल. साफसफाईसाठी अनेक वेळा अमोनिया घरी उपलब्ध नसतो, म्हणून हा सर्वोत्तम उपाय आहे. या व्यतिरिक्त, आपण लिंबासह व्हिनेगरचे मिश्रण देखील स्वच्छतेसाठी वापरू शकता. या मिश्रणात एक कापड किंवा स्क्रबर भिजवून तो पिळून घ्या आणि रॅक स्वच्छ करा.
स्वच्छ केल्यानंतर सुती कापडाने पुसून टाका. साफ सफाई केल्यानंतर, सुमारे 10-15 मिनिटे मांडणी सुकण्यासाठी तशीच ठेवा. ओली भांडी कधीही मांडणीमध्ये ठेवू नका. भांड्यातून पाणी गळत नाहिये याची खात्री केल्यानंतर ते जागच्याजागी ठेवा.