Lokmat Sakhi >Food > Kitchen Tips : किचनमधल्या किटकांना पळवण्यासाठी FSSAI नं दिला 4D नियम; धान्यही वर्षभर चांगलं टिकेल

Kitchen Tips : किचनमधल्या किटकांना पळवण्यासाठी FSSAI नं दिला 4D नियम; धान्यही वर्षभर चांगलं टिकेल

Kitchen Tips : धुतलेल्या भाज्या ओल्या ठेवू नका. ते कोरडे ठेवा जेणेकरून खराब होणार नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 06:04 PM2021-08-01T18:04:31+5:302021-08-01T18:23:01+5:30

Kitchen Tips : धुतलेल्या भाज्या ओल्या ठेवू नका. ते कोरडे ठेवा जेणेकरून खराब होणार नाही. 

Kitchen Tips : FSSAI gave Tips for keep way kitchen bug | Kitchen Tips : किचनमधल्या किटकांना पळवण्यासाठी FSSAI नं दिला 4D नियम; धान्यही वर्षभर चांगलं टिकेल

Kitchen Tips : किचनमधल्या किटकांना पळवण्यासाठी FSSAI नं दिला 4D नियम; धान्यही वर्षभर चांगलं टिकेल

स्वयंपाकघर असे ठिकाण आहे, ज्याचा संपूर्ण घराच्या आरोग्याशी संबंध असतो. म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ आणि किटकमुक्त असणे महत्वाचे आहे. पण असं अनेकदा होत नाही. बऱ्याच वेळा आपण ते स्वच्छ करतो पण कधीकधी झुरळं, किडे, मुंग्या, हलके तपकिरी उडणारे कीटक स्वयंपाकघरात दिसतात. पावसाळ्यात कीटक जास्त त्रास देतात. कारण या हंगामात आर्द्रता जास्त असते आणि कीटकांना वाढीसाठी ओलावा आणि अन्नाची आवश्यकता असते.

स्वयंपाकघरात होणाऱ्या कीटकांमुळे तुम्ही देखील त्रस्त असाल आणि अनेक उपाय करूनही किडे दूर होत नसतील तर त्यामुळे अस्वस्थ होऊ नका. स्वयंपाकघर किटकमुक्त करण्याचे उपाय जाणून घ्या. जे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने कार्यालयांच्या कँटीनसाठी सांगितले आहे. FSSAI ने 4D नियम म्हणून कीटक दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. एफएसएसएआयने नमूद केलेल्या उपायांचा वापर आपल्या घरांच्या स्वयंपाकघरातून कीटक दूर करण्यासाठी देखील करू शकता.

काय आहे FSSAI चा नियम?

FSSAI कडून कर्मचाऱ्यांना त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कार्यालयांमध्ये पोषक आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी ऑरेंज बुक तयार करण्यात आले आहे.   ज्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये अन्न कसे मिळावे, कार्यालयाचे कॅन्टीन कसे असावे, तसेच किटकांपासून मुक्त कॅन्टीन कसे बनवावे याच्या पद्धती दिल्या आहेत.  या स्वच्छतेसाठी बनवलेल्या नियमांना 4 डी नियम म्हणतात. या 4D नियमात किटकांचा प्रवेश न होणं, किटकांना अन्न आणि निवारा न मिळू देणे, किटक नष्ट करणे इत्यादींचा समावेश आहे. 

१) किटकांचा प्रवेश होऊ न देणं

इमारत किंवा घर चांगल्या स्थितीत  असायला हवं. जिथून कीटक येत आहेत किंवा जास्त किडे निर्माण होत आहेत, त्या ठिकाणाची दुरुस्ती करा. किटक कुठून येत आहेत ते खड्डा किंवा छिद्र सील करा. कॅन्टीन किंवा स्वयंपाकघरात प्राण्यांना घेऊन जाऊ नका.

२) अन्न, निवारा मिळू न देणं

स्वयंपाकघरातील अन्न आणि पाणी यामुळे कीटक जन्माला येतात. प्रथम त्यांच्यापासून कीटकांची सुटका करा. अन्न बंद डब्यात ठेवा किंवा मोकळं पडलेलं, भिंतीजवळ ठेवू नका. अन्न ठेवतोय त्या डब्ब्याचा वरील आणि बाहेरील भाग स्वच्छ असावा. कीटक बाहेर पडत आहेत का याची नियमितपणे तपासणी करा आणि इतर कीटक निर्माण झाले आहेत का ते तपासा.

३) किड्यांना नष्ट करा

स्वयंपाकघरात जेथे किडे दिसतात, त्यांना त्वरित नष्ट करा. कीटकनाशक वापरा. परंतु हे लक्षात ठेवा की विषारी औषध अन्नपदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. नाहीतर संसर्ग होण्याची शक्यता असते. 

४) अशी घ्या काळजी

डिटर्जंट आणि साबणाने स्वयंपाकघर स्वच्छ करा.

अन्न शिजवताना स्वच्छ पाण्याने धुवा.

भांडी गरम पाण्यासह साबणानं स्वच्छ करा.

धुतलेल्या भाज्या ओल्या ठेवू नका. ते कोरडे ठेवा जेणेकरून खराब होणार नाही. 

जेवण देताना नाक, तोंडाला हात लावू नका .

खरेदी करण्यापूर्वी सॅनिटायजर किंवा केमिकल नीट तपासा. अन्यथा असे होऊ नये की तुम्ही विकत घेतलेले सॅनिटायझर जंतू मारण्यात कमकुवत आहे. लक्षात ठेवा की कीटकनाशके अन्नपदार्थांच्या जवळ ठेवू नयेत, कारण ती चुकून अन्नात जाऊ शकतात. कीटकनाशके आणि अन्न नेहमी दूर ठेवा.

स्वयंपाकघराशी संबंधित कोणतेही उत्पादन खरेदी करताना लेबल जरूर वाचा. अर्थातच, तुम्ही ते उत्पादन नेहमी खरेदी करत असाल पण त्यानंतर त्याचे लेबल वाचणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या घरात कॅन्टीन स्वच्छ करण्यासाठी FSSAI द्वारे दिलेल्या या उपायांचा अवलंब करू शकता. हा एक चांगला सराव आहे. जर स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर घरातील लोकही आजारांपासून दूर राहतील.

 

Web Title: Kitchen Tips : FSSAI gave Tips for keep way kitchen bug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.