Join us

रात्री छोले भिजवायला विसरलात? ३ टिप्स, पटापट छोले मऊ होतील-छान भिजतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:44 IST

Kitchen Tips Here Is Quick Hacks : रात्री छोले भिजवायला विसरले असाल तर तुम्ही भिजवण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. (Kitchen Tips Here Is Quick Hacks)

प्रत्येक भारतीय घरांमध्ये छोले भात बनवले जातात. छोले खायला खूपच चविष्ट लागतात. छोले खाण्यासाठी तुम्ही ६ ते ८ तास वाट पाहावी लागते. छोले भिजवावे लागतात नंतर ते फुलतात. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही लगेच छोले बनवू शकता. (Quick Hacks To Cook Perfect Chole Without Overnight Soaking) छोले बनवण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो.  यातील फायटीक एसिड कमी होण्यास  मदत होते.  रात्री छोले भिजवायला विसरले असाल तर तुम्ही भिजवण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. (Kitchen Tips Here Is Quick Hacks)

1) गरम पाण्यात मीठ घाला

छोले आधी २ वेळा धुवून घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून  घ्या. त्यात धुतलेले छोले घाला, नंतर यात मीठ गरम पाणी घाला. झाकण लावून कमीत कमी एक तासासाठी वेगळे ठेवून द्या. एक तासात  छोले मऊ-मुलायम होतील.

2) पाणी उकळवण्याचा प्रयत्न

पाणी उकळवून घ्या. छोले जवळपास ५ ते १० मिनिटं उकळू द्या नंतर आचेवर बंद करा. नंतर भांडी झाकून ठेवून घ्या. छोले  १ ते २ तासांनी गरम पाण्यात ठेवून द्या. त्यानंतर पाणी बाहेर काढा. छोले तयार होतील. हा उपाय प्रभावी रिजल्ट देऊ शकतो. 

३) सोड्याचा वापर करा

छोले प्रेशर कुकर किंवा भांड्यात घालून त्यात इतकं पाणी घाला की पाण्यात छोले बुडतील. पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा अर्धा चमचा इनो घाला. बेकिंग सोडा आणि इनोनं छोल्यांचा हार्डनेस कमी होईल. छोले शिजवण्याचा टाईम कमी होईल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सलाइफस्टाइलअन्न