Lokmat Sakhi >Food > Kitchen Tips : दगडाचा असो किंवा लोखंडाचा; या घ्या खलबत्ता स्वच्छ करण्याच्या भन्नाट ट्रिक्स, नेहमी दिसेल नवा कोरा

Kitchen Tips : दगडाचा असो किंवा लोखंडाचा; या घ्या खलबत्ता स्वच्छ करण्याच्या भन्नाट ट्रिक्स, नेहमी दिसेल नवा कोरा

Kitchen Tips :  प्रत्येक प्रकारचा खलबत्ता स्वच्छ करण्याची एक वेगळी पद्धत देखील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:26 PM2021-09-01T16:26:47+5:302021-09-01T16:50:32+5:30

Kitchen Tips :  प्रत्येक प्रकारचा खलबत्ता स्वच्छ करण्याची एक वेगळी पद्धत देखील आहे.

Kitchen Tips : How to clean different types of khalbatta | Kitchen Tips : दगडाचा असो किंवा लोखंडाचा; या घ्या खलबत्ता स्वच्छ करण्याच्या भन्नाट ट्रिक्स, नेहमी दिसेल नवा कोरा

Kitchen Tips : दगडाचा असो किंवा लोखंडाचा; या घ्या खलबत्ता स्वच्छ करण्याच्या भन्नाट ट्रिक्स, नेहमी दिसेल नवा कोरा

Highlightsअॅल्युमिनियमपासून बनवलेला खलबत्ता उत्तम प्रकारे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू वापरू शकता. लिंबाचा रस ऊखळ आणि मुसळीवर असलेली घाण आणि चिकटपणा मुळापासून काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. बहूतेक भारतीय स्वयंपाकघरात एल्यूमिनियम, लोखंड किंवा दगडापासून तयार झालेल्या खलबत्त्याचा वापर केला जातो. प्रत्येक प्रकारचा खलबत्ता स्वच्छ करण्याची एक वेगळी पद्धत देखील आहे.

जेव्हाही घरात वेलची किवा आल्याचा चहा बनवला  जातो तेव्हा वेलची किंवा आलं कुटण्यासाठी मिक्सर नाही तर खलबत्त्याचा वापर केला जातो.  भाजीत आलं, मिरची, लसणाचं वाटणं घालण्यासाठी खलबत्त्याचा वापर केला जातो. बहूतेक भारतीय स्वयंपाकघरात एल्यूमिनियम, लोखंड किंवा दगडापासून तयार झालेल्या खलबत्त्याचा वापर केला जातो. प्रत्येक प्रकारचा खलबत्ता स्वच्छ करण्याची एक वेगळी पद्धत देखील आहे. उदाहरणार्थ, लाकडापासून बनवलेला खलबत्ता स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करावा लागत नाही. या लेखात आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खलबत्ते  स्वच्छ करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

१) अ‍ॅल्यूमिनियम खलबत्ता साफ करण्याची योग्य पद्धत

अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेला खलबत्ता उत्तम प्रकारे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू वापरू शकता. लिंबाचा रस ऊखळ आणि मुसळीवर असलेली घाण आणि चिकटपणा मुळापासून काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी तीन ते चार कप पाणी गरम करावे लागेल. पाणी गरम झाल्यावर त्यात एक ते दोन चमचे लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करावे.आता या पाण्यात अ‍ॅ ल्युमिनियमचा खलबत्ता घाला आणि काही काळ तसंच सोडा. जेव्हा पाणी थंड होईल, तेव्हा त्याला स्वच्छ स्क्रबरने घासून चांगले स्वच्छ करा. तुम्हाला दिसेल की खलबत्ता एकदम चकचकीत दिसत आहे.

२) दगडाचा खलबत्ता कसा स्वच्छ करायचा?

आपण दगडी भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू देखील वापरू शकता, परंतु एक चांगला पर्याय बेकिंग सोडा आहे. कधीकधी तळाच्या भागावर घाणीचा जाड थर जमा होतो, ज्यासाठी बेकिंग सोडा हा सर्वोत्तम घरगुती उपचारांपैकी एक असू शकतो. यासाठी आधी पाणी आणि बेकिंग सोड्याचे लिक्विड तयार करा. आता या लिक्विडमध्ये क्लिनिंग ब्रश बुडवा आणि घाणीच्या भागावर चांगले घासा. याशिवाय, काही काळ या लिक्विडमध्ये खलबत्ता ठेवल्यानंतरही तुम्ही ते स्वच्छ करू शकता.

३) लाकडाचा खलबत्ता साफ करण्याची योग्य पद्धत

अनेक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये लाकडाच्या ऊखळ, मुसळीचा वापर करतात. अशा स्थितीत स्वच्छतेसाठी जास्त पाणी वापरणे म्हणजे खलबत्ता खराब करण्यासारखे आहे. कारण, आर्द्रतेमुळे त्यात पांढरे-पांढरे डाग दिसू लागतात. अशा खलबत्त्यात मसाले कुटून झाल्यानंतर पेपर दुमडून आतून व्यवस्थित  साफ करून घ्या आणि त्यानंतर एक स्वच्छ कापड पाण्यात भिजवून घ्या आणि पिळून घ्या. मग या कापडानं खलबत्ता स्वच्छ करा. ओल्या कापडानं पुसल्यानंतर काहीवेळ खलबत्ता उन्हात सुकायला  ठेवा. 

४) लोखंडाचा किंवा इतर धातूंचा खलबत्ता  स्वच्छ कसा करावा?

लोखंडाचा खलबत्ता स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि व्हिनेगर वापरू शकता. यासाठी, हे घटक पाण्यात मिसळल्यानंतर थोडावेळ थांबा, नंतर या पाण्यानं तुम्ही खलबत्ता स्वच्छ करू शकता. बऱ्याच स्त्रिया पितळाचा खलबत्ता आणि मुसळ वापरतात. या प्रकारच्या खलबत्त्यांच्या साफसफाईसाठी फक्त सामान्य डिटर्जंटचा वापरसुद्धा चांगली चमक मिळवून देऊ शकतो. 

Web Title: Kitchen Tips : How to clean different types of khalbatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.