Join us  

Kitchen Tips: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील रवा, मैद्याला मुंग्या, किड लागू नये; यासाठी 'या' टिप्स वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 3:48 PM

Kitchen Tips : किडे होण्याच्या भीतीने पावसाळ्यात बायका अगदी कमी प्रमाणात घरात सामान भरून ठेवतात. कारण एकदा रव्याला  किड लागली की तो वापरण्यायोग्य राहत नाही.

ठळक मुद्देदालचिनीच्या सहाय्याने आपण पावसाळ्यात रव्यात किडे होण्यापासून रोखू शकतो. यासाठीही सर्वप्रथम रवा हवाबंद डब्यामध्ये ठेवा. बरेच लोक  पदार्थांना कीटकांपासून वाचवण्यासाठी कडुनिंबाची पानं देखील वापरतात. पण ते खराब होण्याची भीती असते.

इतर दिवसांच्या तुलनेत पावसाळ्याच्या दिवसात स्वयंपाक घरामध्ये बर्‍याच गोष्टी खराब होतात. उदाहरणार्थ, चण्याचं पीठ, मैदा, मसाला पावडर इत्यादी गोष्टी दोन ते तीन आठवड्यांत खराब होतात. पावसाळ्यात स्वयंपाक घरातील पदार्थ व्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

रवा, चण्याचे पीठ अशा पदार्थांचे पॅकेट उघडल्यानंतर काही दिवस किंवा काही महिन्यांनंतर त्यात मुंग्या, किडे अडकून राहतात.  किडे होण्याच्या भीतीने पावसाळ्यात बायका अगदी कमी प्रमाणात घरात सामान भरून ठेवतात. कारण एकदा रव्याला किड लागली की तो वापरण्यायोग्य राहत नाही. फेकून  देण्याशिवाय  कोणताही पर्याय नसतो. स्वयंपाक घरातील पदार्थ जास्त दिवस चांगले राहण्यासाठी काही टिप्स वापरल्यानं मुंग्या आणि किडयांपासून लांब ठेवता येऊ शकतं. 

वेलची

वेलची स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. बरेच लोक त्याशिवाय तयार केलेला चहा पिणं देखील पसंत करत नाहीत. जर घरात वेलची असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात रवा लवकर खराब होण्यापासून वाचवू शकता. यासाठी, सर्वप्रथम, रव्याला हवाबंद डब्यात ठेवा. यानंतर एका कागदामध्ये चार ते पाच वेलची चांगल्या प्रकारे लपेटून घ्या आणि रव्याच्या डब्यामध्ये ठेवून चांगले बंद करा. असे केल्याने रवामध्ये कधीही किडे, मुंग्या होणार नाहीत.

दालचीनी

दालचिनीच्या सहाय्याने आपण पावसाळ्यात रव्यात किडे होण्यापासून रोखू शकतो. यासाठीही सर्वप्रथम रवा हवाबंद डब्यामध्ये ठेवा. यानंतर दालचिनीची पूड किंवा एक ते दोन इंच संपूर्ण दालचिनी कागदाला लपेटून घ्या. आता डब्यामध्ये दालचिनी घाला आणि डबा चांगला बंद करा. दालचिनीच्या वापराने रवा, मैदा एक ते दोन महिन्यांपर्यंत खराब होत नाही.

तमालपत्र, मोठी वेलची

बरेच लोक  पदार्थांना कीटकांपासून वाचवण्यासाठी कडुनिंबाची पानं देखील वापरतात. पण ते खराब होण्याची भीती असते. कडुलिंबाच्या पानांऐवजी तुम्ही तमालपत्र आणि मोठी वेलची वापरुन रवा, मैदा चांगला ठेवू शकता. यासाठी, आपण त्यांना  मोठी वेलची कागदावर लपेटू शकता किंवा तमालपत्र आहे तसेच रव्या, मैद्याच्या डब्यात ठेवून झाकण व्यवस्थित लावून घ्या. या उपायांनी तुम्ही स्वयंपाक घरातील पदार्थ अनेक दिवसांपर्यंत व्यवस्थित टिकवून ठेवू शकता.

टॅग्स :अन्नआरोग्य