Join us  

फ्रिजमध्ये ठेवलेले लिंबू सुकतात-काळे होतात? ५ भन्नाट टिप्स, महिनाभर रसाळ-ताजे राहतील लिंबू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 7:39 PM

Kitchen Tips : लिंबांची शेल्फ लाईफ खूपच कमी असते म्हणूनच ते लवकर सुकतात.

लिंबाचा  वापर सर्वांच्याच घरी केला जातो. (Kitchen Hacks) वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर  केला जातो. लिंबू एसिडीक असतो म्हणूनच लिंबू योग्य तापमानात स्टोअर करावे लागतात. अन्यथा लिंबू लवकर खराब होण्याची शक्यता असते. (How to store lemon for long time)

लिंबांची शेल्फ लाईफ खूपच कमी असते म्हणूनच ते लवकर सुकतात. (Food Hacks) लिंबू स्टोअर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फ्रिजमध्ये लिंबू ठेवल्यानंतर ते काही दिवसांनी सुकतात किंवा काळे पडतात. लिंबू महिनोंमहिने ताजे रहावेत यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. (How to Store Lemons So They Stay Fresh)

लिंबू पाण्यात घालून ठेवा

लिंबू जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात ठेवा. सगळे लिंबू पाण्याने भरलेल्या जारमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून अनेक दिवस लिंबू ताजे आणि रसाळ राहतील.

रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

लिंबू कलिंगड आणि सफरचंदाबरेबर ठेवू नका

एथिलीन एक हॉर्मोन आहे जे फळं पिकण्याचे आणि लवकर खराब होण्याचे कारण ठरते. लिंबू खूपच सेंसिटिव्ह असते. यासाठी लिंबू इतर फळांबरोबर ठेवू नयेत. यातून एथिलीन रिलीज होते.

सिलबंद ठेवा

लिंबू स्टोअर करण्याची सगळ्यात प्रभावी  पद्धत म्हणजे सिलबंद करू ठेवा. लिंबू खराब होऊ नयेत यासाठी एका सिलबंद जीप लॉक बॅगमध्ये ठेवा. यामुळे हवा बॅगमध्ये शिरत नाही यामुळे लिंबू दीर्घकाळ चांगले राहतात.

५८ व्या वर्षीही हॉट-फिट दिसणारे मिलिंद सोमण रोज खातात तरी काय? पाहा साधा डाएट प्लॅन...

प्लास्टीक डब्यांचा वापर करा

आपल्या सर्वांच्याच घरात प्लास्टिकचे कंटेनर्स असतात. या डब्यांचा वापर तुम्ही लिंबू ठेवण्यासाठीही करू शकता. सगळ्यात आधी लिंबू प्लास्टिकच्या पॉलिथीनमध्ये गुंडाळून घ्या नंतर हबाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. 

एल्युमिनियम फॉईलने रॅप करा

जर तुम्ही कमी लिंबू आणले असतील तर ते रॅप करण्याासाठी एल्युमिनियम फॉईलचा वापर करू शकता.  प्रत्येक लिंबू एल्युमिनियम फॉयलमध्ये गुंडाळून ठेवू द्या. यामुळे लिंबातील मॉईश्चर निघून जाण्यास मदत होईल आणि लिंबू जास्त दिवस चांगले राहतील.

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.