Join us  

बेकींग सोडा आणि बेकींग पावडरमध्ये नेमका फरक काय? काय जास्त उपयोगी? पंकज भदौरीया सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2023 10:10 AM

Know Difference Between Baking Powder and Baking Soda : या दोन्हीचे केमिकल कॉम्बिनेशन वेगळे असून त्याचे उपयोगही वेगळे असतात

ठळक मुद्देदोन्ही एकमेकांना पर्याय म्हणून वापरु शकतो का? कशाचा उपयोग काय हे समजून सांगतात पंकज भदौरीया

स्वयंपाकघरात इडली, डोसा किंवा ढोकळा यांसारखे पदार्थ असोत किंवा केक, बिस्कीट यांसारखे बेकरी प्रॉडक्ट असोत बेकींग सोडा आणि बेकींग पावडर आपण वापरतो. पण बेकींग सोडा म्हणजेच बेकींग पावडर असा काही जणांचा समज असतो. एखादवेळी घरात सोडा नसेल तर त्याऐवजी पावडर वापरु किंवा पावडर नसेल तर सोडा वापरुया असं आपल्याला वाटतं मात्र या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यातील फरक समजून घेणे आणि त्यानुसार त्याचा वापर करणे गरजेचे असते. या दोन्हीचे केमिकल कॉम्बिनेशन वेगळे असून त्याचे उपयोगही वेगळे असतात. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया आपल्याला हाच फरक समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकताच याविषयीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे (Know Difference Between Baking Powder and Baking Soda). 

दोन्हीत नेमका फरक काय?

बेकींग सोडा म्हणजे सोडीयम बायकार्बोनेट असतो. याला अॅक्टीव्ह करण्यासाठी आपल्याला २ गोष्टींची आवश्यकता असते एक द्रव पदार्थ आणि दुसरा अॅसिडीक पदार्थ. म्हणजेच दही, लिंबू, व्हिनेगर यांसारखे पदार्थ. सोडा घेऊन त्यामध्ये हे पदार्थ घालून पाणी घातल्यावर सोडा फसफसतो आणि त्यामध्ये बुडबुडे येतात. तर बेकींग पावडरमध्ये अशाप्रकारे कोणतेही आंबट घटक घालण्याची आवश्यकता नसते. कारण त्यामध्ये अॅसिड असते. बेकींग पावडरमध्ये फक्त पाणी घातले की त्यातील कार्बनडायऑक्साईड रिलिज होतो आणि त्यावर बुडबुडे येतात. म्हणूनच पदार्थ फुलण्यासाठी बेकींग पावडरचा वापर केला जातो. 

 

 

कशाचा वापर कधी करायचा? 

बेकींग सोडाच्या ऐवजी बेकींग पावडर वापरत असाल तर आपल्याला ३ पट जास्त बेकींग पावडर घ्यावी लागेल. घरात बेकींग पावडर नसेल तर त्या ऐवजी बेकींग सोडा वापरु शकतो. कारण बेकींग सोडा हा पावडरच्या केवळ एक तृतियांश घ्यावा लागतो. म्हणजेच बेकींग पावडर ३ चमचे घेत असलो तर बेकींग सोडा केवळ १ चमचा किंवा त्याहून कमी पुरे होतो. बेकींग पावडर आपण साधारणपणे केकसाठी वापरतो. पण सोडा आपण भजी, साऊथ इंडीयन पदार्थ, वडे, कुकीज अशा कोणत्याही गोष्टींमध्ये वापरु शकतो. इतकंच नाही तर फळं आणि भाज्या साफ करण्यासाठीही आपण बेकींग सोड्याचा वापर करु शकतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.