Join us  

तळण्यासाठी वापरलेले तेल काळे होते, ते स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, मात्र खाण्यासाठी वापरणार असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 3:11 PM

Know How To Clean Used cooking oil for reuse simple trick : एकदा वापरलेले तेल वाया न घालवता स्वच्छ करुन पुन्हा वापरणे शक्य...

तेल हा भारतीयांच्या आहारातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक पदार्थाला फोडणी देण्यासाठी नाहीतर पुऱ्या, वडे, भजी, पापड किंवा अन्य काही तळण्यासाठी आपल्याकडे तेलाचा भरपूर वापर केला जातो. पुऱ्या किंवा पापड-कुरडई तळण्यासाठी कढईत कमी तेल घेऊन चालत नाही. त्यामुळे एकदा हे तळण झाले की कढईत बरेच तेल उरते. पण हे तेल आपण जसेच्या तसे वापरु शकत नाही कारण त्यात पुऱ्यांचे पीठ किंवा पापडाचे लहान लहान तुकडे असे काही ना काही खाली पडलेले असते आणि तेलही काही प्रमाणात काळे झालेले असते (Know How To Clean Used cooking oil for reuse simple trick). 

तेल ही महागाची गोष्ट असल्याने आपण हे इतके तेल फेकून तर देऊ शकत नाही. अशावेळी हे तेल स्वच्छ करण्यासाठी आपण ते गाळणीने गाळतो. पण त्यातले लहान आकाराचे काळे कण पूर्णपणे निघत नाहीत. अशावेळी तेल वाया जाऊ नये आणि सहज स्वच्छही करता यावं यासाठी काय करता येईल असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. तर हे तेल साफ करण्याची एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तेलातील काळे कण पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. 

१. तळलेले तेल कढईमध्ये नीट गार होऊ द्यावे. 

(Image : Google )

२. त्यानंतर  या तेलात एक वेलची फोडून टाकायची म्हणजे तळलेल्या तेलाचा उग्रपणा कमी होण्यास मदत होते.

३. मग एका वाटीत एक चमचा मैदा घेऊन त्यात थोडे पाणी टाकून त्याची स्लरी तयार करायची. 

४. ही मैद्याची स्लरी या गार झालेल्या तेलात घालायची. 

५. मग हे तेल गाळणीने गाळायचे, तेलात असलेले काळे कण मैद्यामध्ये जमा होतात आणि गाळणीत राहतात.

६. अशारितीने एकदा वापरलेले तेल स्वच्छ होण्यास मदत होते आणि ते तेल आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स