Lokmat Sakhi >Food > बिर्याणी, तवा पुलावसाठी भात मोकळा फडफडीत शिजवण्याची १ सोपी युक्ती, भात शिजेल मऊ आणि मोकळा...

बिर्याणी, तवा पुलावसाठी भात मोकळा फडफडीत शिजवण्याची १ सोपी युक्ती, भात शिजेल मऊ आणि मोकळा...

Know how to Cook perfect dry steam Rice Cooking tips : मोकळा भात करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 06:02 PM2024-01-23T18:02:56+5:302024-01-23T18:06:26+5:30

Know how to Cook perfect dry steam Rice Cooking tips : मोकळा भात करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत...

Know how to Cook perfect dry steam Rice Cooking tips : 1 easy trick to cook rice dry for biryani, tawa pulao, the rice will cook soft and fluffy... | बिर्याणी, तवा पुलावसाठी भात मोकळा फडफडीत शिजवण्याची १ सोपी युक्ती, भात शिजेल मऊ आणि मोकळा...

बिर्याणी, तवा पुलावसाठी भात मोकळा फडफडीत शिजवण्याची १ सोपी युक्ती, भात शिजेल मऊ आणि मोकळा...

भात हा आपल्या आहारातील एक मुख्य पदार्थ आहे. कोकणी किंवा दक्षिणेकडील लोकांच्या आहारात तर प्रामुख्याने भात असतो. दररोजच्या जेवणाला आपण साधा भात करतो. पण विकेंडला किंवा सणावाराला आणि पाहुणे आल्यावर आपण नेहमीपेक्षा वेगळा भात करतो. यामध्ये व्हेज पुलाव, तवा पुलाव, बिर्याणी, जीरा राईस, फ्राईड राईस असे वेगवेगळ्या प्रकारचे भात असतात. साधा भात चिकट झाला तरी चालतो पण भाताचे हे वेगळे प्रकार भात मोकळा आणि फडफडीत शिजला असेल तरच चांगले लागतात (Know how to Cook perfect dry steam Rice Cooking tips). 

अनेकदा आपण भात शिजायला लावल्यावर तो मोकळा न शिजता तो चिकट किंवा घट्टसर होतो. अशावेळी आपला भाताचा प्रकार बिघडण्याचीच शक्यता जास्त असते. भात मोकळा आणि परफेक्ट शिजावा यासाठी नेमका कोणता तांदूळ वापरायचा, पाणी किती घालायचे आणि शिजवताना नेमकं काय करायचं हे समजून घेतलं तर भाताचे प्रकार छान होऊ शकतात. प्रसिद्ध शेफ मधुरा बाचल यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स देतात. पाहूयात या टिप्स कोणत्या आणि त्या कशा वापरायच्या...

(Image : Google)
(Image : Google)

१. शक्यतो अख्खा, जुना बासमती तांदूळ घ्यायचा. हा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवायचा. 

२. पाण्यात भिजल्याने तांदळात पाण्याचा अंश मुरतो आणि भात छान शिजतो. नंतर तांदूळ भिजवलेले पाणी काढून टाकायचे आणि हा तांदूळ दुसऱ्या एका भांड्यात घ्यायचा. 

३. तुम्ही १ वाटी बासमती तांदूळ घेतला असेल तर साधारण १.५ वाटी पाणी घालायचे. 

४. एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये घेऊन यामध्ये मीठ घालायचं आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर भात चांगला शिजवायचा.   

५. पाणी आटले असे वाटल्यावर झाकण तसेच ठेवून गॅस बंद करायचा आणि जवळपास २० मिनीटे झाकण बंदच ठेवायचे. यामुळे यात पाण्याचा जो थोडा अंश उरलेला असेल तो भातात मुरण्यास मदत होते. 

Web Title: Know how to Cook perfect dry steam Rice Cooking tips : 1 easy trick to cook rice dry for biryani, tawa pulao, the rice will cook soft and fluffy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.