Join us  

हॉटेलस्टाइल चीज मसाला पाव करण्याची पाहा चमचमीत रेसिपी, नेहमीच्या पावभाजीला द्या ट्विस्ट, मुले खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 1:08 PM

Know How to make hotel style Masala Pav at home Easy recipe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी चविष्ट रेसिपी...

आपल्याला सतत पोळी-भाजी आणि भात-आमटी खाऊन कंटाळा येतो. मग साहजिकच आपली पावलं हॉटेलकडे वळतात. पण हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे जिन्नस आणि त्याच्या किमती यामुळे कळत असूनही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण हॉटेलमध्ये खातो. पण लहान मुलांनी जास्तीत जास्त घरात खावे असा आपला अट्टाहास असतो. पाव ही मुलांच्या आवडीची गोष्ट, घरात पाव असेल तर झटपट अशी एक चविष्ट रेसिपी आपण करु शकतो. पोटभरीची आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही हटके रेसिपी करण्यासाठी घरात फार सामान असण्याचीही आवश्यकता नसते. हॉटेलमध्ये पावभाजी खायला गेलो की आपण आवर्जून ऑर्डर करतो तो पदार्थ म्हणजे मसाला पाव. तोंडाला चव आणणारी आणि अतिशय चमचमीत अशी हा पदार्थ करायला सोपा असून तो परफेक्ट हॉटेलस्टाईल होण्यासाठी काय करायचं पाहूया (Know How to make hotel style Masala Pav at home Easy recipe)..

साहित्य -

१. पाव - ५ ते ६ 

२. पावभाजी मसाला - २ चमचे 

३. बटर - २ चमचे 

४. कांदा - १ 

५. टोमॅटो - १ 

(Image : Google)

६. बटाटा - १ उकडलेला 

७. शिमला मिरची - १ वाटी बारीक चिरलेली

८. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा 

९. तिखट - अर्धा चमचा 

१०. मीठ - चवीनुसार 

११. लसूण - अर्धा चमचा 

१२. कोथिंबीर - २ चमचे 

१३. चीज - १ वाटी 

कृती - 

१. पॅनमध्ये बटर आणि तेल घालून त्यात लसूण, कांदा घालून चांगले परतून घ्यायचे. 

२. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची आणि उकडून मॅश केलेला बटाटा घालायचा. 

३. हे सगळे एकजीव करुन त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढायची.

४. त्यानंतर झाकण काढून तिखट, पावभाजी मसाला, धणे-जीरे पावडर आणि मीठ घालून सगळे चांगले एकजीव करायचे. 

५. तयार झालेल्या या भाजीवर भरपूर कोथिंबीर घालून ती एका बाऊलमध्ये काढून ठेवायची.

६. तव्यावर बटर घालून पाव दोन्ही बाजुने चांगले खरपूस भाजून घ्यायचे.

७. त्यानंतर पावावर भरपूर चीज घालायचे आणि त्यावर तयार केलेला मसाला घालायचा. 

८. हा पाव पुन्हा एकदा तव्यावर दोन्ही बाजुने गरम करुन घ्यायचा आणि गरमागरम खायचा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.