Join us  

डाळी, तांदूळ महिनोंमहिने खराब होणार नाही; ८ किचन ट्रिक्स, अळ्या, किडे धान्यात नाही पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 4:05 PM

How to prevent pulses from insects : हवेच्या संपर्कात आल्यानं ड्रायफुट्स नरम पडतात. ड्राय फ्रुट्स जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी हलके भाजा.

डाळ, तांदूळ भरून ठेवले की त्याला अळ्या लागतात किंवा चुकून पाण्याचा हात लागला तर तांदूळ गोळा व्हायला लागतात. धान्य महिनोंमहिने चांगलं टिकून कसं राहील हाच मोठा प्रश्न असतो. (Know how to prevent pulses from insects here are some easy hacks) एकदा धान्य खराब झालं की त्यातील अळ्या, पोर कीडे निवडत बसायला फारसा वेळही नसतो. धान्य, किचनमधील इतर खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स पाहूया. (Kitchen Tips & Hacks)

१) डाळी,  तांदळाला अळ्या लागू नये म्हणून रिकामी काडेपेटी घालून ठेवा. मात्र डाळ वापरल्यापूर्वी स्वच्छ धुवायला विसरू नका. याशिवाय लवंगसुद्धा तुमचं काम अधिक सोपं करेल. डाळींच्या डब्यात ८ ते १० लवंग घालून  त्यात मिक्स करा.

२) तांदूळ कधीच प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका. तांदूळ नेहमीच एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे ते जास्तवेळ चांगले राहतील. त्यात कडुलिंबाची पानं किंवा ६ ते ७ लाल मिरच्या घाला. यामुळे  तांदळात अळ्या पडणार नाहीत.

३) रव्याला किडे, अळ्या लागू नये म्हणून साठवण्याआधी हलकं भाजून घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही ८ ते १० लवंग त्यात घालू शकता. जेणेकरून किड लागणार नाही. 

४) मसाले नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. मसाले गोळा  होऊ नयेत म्हणून त्यात थोडं मीठ घालून ठेवा.

५) साखर आणि मीठ फक्त चिकट होत नाहीत तर वितळू लागतात. ही समस्या टाळण्यासाठी काचेच्या बरणीत ठेवा. साखर आणि मीठाच्या डब्यात थोडा तांदूळही ठेवू शकता.

६) हवेच्या संपर्कात आल्यानं ड्रायफुट्स नरम पडतात. ड्राय फ्रुट्स जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी हलके भाजा. जेणेकरून किड लागण्याची शक्यता कमी असते. 

 थंडीत परफेक्ट दही लावण्याच्या २ सिक्रेट ट्रिक्स; वड्या पडतील असं घट्ट दही घरीच बनेल

७) डाळी जर तुम्ही कमी प्रमाणात आणत असाल तर त्या किड लागू नये म्हणून फ्रीजमध्येही साठवून ठेवू शकता. बाजारातून आणल्यानंतर एका स्वच्छ हवाबंद भरणीत डाळी भरून फ्रीजमध्ये ठेवा. 

८) डाळीत सोललेल्या लसणाच्या पाकळ्या टाका आणि नीट मिक्स करा, लसूण सुकणार नाही याची काळजी घ्या, जर सुकली तर दुसरी लसूण पाकळी घाला, यामुळे डाळ सुरक्षित राहते आणि किडेही लागणार नाहीत.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य