पदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत आवर्जून कडीपत्ता वापरतो. कडीपत्ता हा मसाल्याच्या पदार्थांपैकी एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. बाजारातून आपण कडीपत्ता आणतो खरा पण तो (know How to Store Curry Leaves fresh for long) फारतर एक किंवा दोन दिवस चांगला राहतो, नंतर लगेचच वाळून जातो. कडीपत्ता (How To Store Curry leaves for 8 to 10 Days) एकदा वाळला की त्याचा स्वाद तर कमी होतोच पण फोडणीत घातला तरी त्याची विशेष चव लागत नाही. मग असा कडीपत्ता आपण शक्यतो फेकूनच देतो. पण हिरवागार कडीपत्ता असेल तर तो पदार्थात (Kitchen Tip to Store Curry Leaves for Long Time) घालायलाही छान वाटतो. काही वेळा तर फ्रिजमध्ये नीट ठेवूनही हा कडीपत्ता काळा पडतो. एकदा कडीपत्त्याची पानं वाळली किंवा तो काळा पडला की तो फेकूनच द्यावा लागतो(How to clean and store Curry Leaves Fresh for Longer).
कडीपत्ता बरेच दिवस ताजा राहण्यासाठी आणि स्वयंपाकात वापरता यावा यासाठी तो साठवण्याची १ सोपी ट्रिक पाहूयात. ज्यामुळे हा कडीपत्ता चांगला १५ ते २० दिवस आहे तसाच छान हिरवागार राहू शकतो.यामुळे कडीपत्ता आणि पैसे दोन्हीही वाया जाणार नाही.पाहूयात कडीपत्ता साठवण्याची सोपी ट्रिक...
कडीपत्ता खराब न होता दीर्घकाळ स्टोअर करून ठेवण्याच्या पद्धती...
१. तेलाचा असा करा वापर :- कडीपत्ता खराब न होता स्टोअर करुन ठेवण्यासाठी आपण तेलाचा वापर करु शकतो. यासाठी सर्वात आधी कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यावा. स्वच्छ धुतलेला कडीपत्ता व्यवस्थित वाळवून घ्यावा. कडीपत्ता नीट वाळल्यावर, एका पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात हा कडीपत्ता घालूंन हलकेच परतून घ्यावा. हा तेलात परतवून घेतलेला कडीपत्ता गार झाल्यावर एका डब्यात भरुन स्टोअर करून ठेवावा. अशा प्रकारे तेलात हलकेच परतवून घेतलेला कडीपत्ता किमान ६ महिने तरी खराब न होता किंवा काळा न पडता चांगला टिकून राहतो.
यंदा संक्रांतीसाठी करा वाटीभर तिळाचा हलवा, खाऊन मन होईल तृप्त, खास पारंपरिक पदार्थ...
२. कडीपत्त्याची पावडर :- एवढं करून ही कढीपत्त्याची पानं वाळलीच तर ती उन्हात कडक वाळू द्या. नंतर मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या. वरण, भाजी, चटणी यांना चव आणण्यासाठी या पावडरचा खूप चांगला वापर करता येतो.
३. उन्हात वाळवा :- आपण कडीपत्ता बराच काळ स्टोअर करून ठेवण्यासाठी तो उन्हात देखील वाळवू शकतो. यासाठी सर्वात आधी कडीपत्ता स्वच्छ धुवून तो एका सुती कापडावर पसरवून घ्यावा. त्यानंतर तो उन्हात ठेवून व्यवस्थित वाळवून घ्यावा. त्यानंतर असा वाळलेला कडीपत्ता डब्यांत स्टोअर करून ठेवावा.
हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...
४. झीप लॉक बॅग :- कडीपत्ता स्टोअर करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे एअर टाईट डबा नसेल तर कढीपत्त्याची पानं एखाद्या झीप लॉक असणाऱ्या प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा. प्रत्येकवेळी या बॅगेतून पाने घेताना बॅगचं लॉक व्यवस्थित लागलेलं असेल, याची खात्री करून घ्या.
रात्रीचा डाळ - भात उरला ? १५ मिनिटांत करा सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत धिरडं, घ्या सोपी रेसिपी...