Lokmat Sakhi >Food > कोबीची भाजी नेहमी खाता, एकदा ५ मिनिटांत कोबीची कोशिंबीर करा, कोबी आवडायला लागेल..

कोबीची भाजी नेहमी खाता, एकदा ५ मिनिटांत कोबीची कोशिंबीर करा, कोबी आवडायला लागेल..

Kobichi Koshimbir| Maharashtrian Cabbage Salad : ५ मिनिटात कोबीची कोशिंबीर करण्याची पाहा कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 07:35 PM2024-09-16T19:35:14+5:302024-09-16T19:36:08+5:30

Kobichi Koshimbir| Maharashtrian Cabbage Salad : ५ मिनिटात कोबीची कोशिंबीर करण्याची पाहा कृती

Kobichi Koshimbir| Maharashtrian Cabbage Salad | कोबीची भाजी नेहमी खाता, एकदा ५ मिनिटांत कोबीची कोशिंबीर करा, कोबी आवडायला लागेल..

कोबीची भाजी नेहमी खाता, एकदा ५ मिनिटांत कोबीची कोशिंबीर करा, कोबी आवडायला लागेल..

आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये कोबीची भाजी हमखास केली जाते (Kobichi Koshimbir). कोबीची भाजी किंवा भजी आवडीने खाल्ली जाते. लोक आपल्या पद्धतीनुसार कोबीची भाजी करतात (Food). पण आपण कधी कोबीची कोशिंबीर करून पाहिली आहे का? साधारणपणे काकडीची किंवा गाजराची कोशिंबीर केली जाते (Cooking Tips).

जर आपण फिटनेस फ्रिक असाल तर, कोबीची कोशिंबीर करून पाहा. कुरकुरीत आणि चमचमीत कोशिंबीर आपल्याला नक्की आवडेल. शिवाय ही कोशिंबीर बनवणंही सोपं आहे. घरी खायला चपातीसोबत भाजी नसेल तर, आपण ही कोशिंबीर नक्कीच ट्राय करून पाहू शकता(Kobichi Koshimbir| Maharashtrian Cabbage Salad).

कोबीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य


कोबी

तेल

मोहरी

जिरं

कडीपत्ता

हिंग

हिरवी मिरची

तवा काळपट - गॅस बर्नरही अस्वच्छ? तुरटी - बेकिंग सोड्याचा सोपा उपाय; चकचक चमकतील वस्तू

मीठ

कोथिंबीर

साखर

शेंगदाण्याचं कूट

दही

कृती

सर्वात आधी कोबी बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोबी एका बाऊलमध्ये काढून घ्या. फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घ्या. त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मिक्स करा. तयार फोडणी कोबीमध्ये घालून मिक्स करा.

सापांची भीती वाटते, घराजवळ साप निघतात? घरात लावा ४ रोपं; साप- किडे फिरकणार नाहीत..

नंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार साखर, शेंगदाण्याचं कूट घालून साहित्य एकजीव करा. शेवटी वाटीभर दही घालून साहित्य एकजीव करा. अशा प्रकारे कुरकुरीत - चमचमीत कोबीची कोशिंबीर खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Kobichi Koshimbir| Maharashtrian Cabbage Salad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.