दोन आठवड्यातून एकदा तरी कोबीची भाजी घरात तयार होतेच. कोबीचे अनेक पदार्थ तयार केले जातात. कोबीची भाजी, कोबीची भजी, कोबीचे पराठे, तर काहींकडे कोबीची वडी देखील तयार केली जाते. कोबी हे फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए आणि के तसेच इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.
त्यामुळे जे लोकं कोबीची भाजी खाण्यास नाक मुरडतात, त्यांच्यासाठी खास कोबीची वडी तयार करा. कोथिंबीर आणि अळूवडी नेहमीचीच, जर सणावाराच्या दिवसात तोंडी लावण्यासाठी काहीतरी हटके पदार्थ तयार करायचं असेल तर, कोबीची वडी नक्कीच ट्राय करून पाहा(Kobichi Vadi Recipe | Crispy Cabbage Fritters).
कोबीची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य
कोबी
धणे
जिरं
हिरव्या मिरच्या
सणावाराला करा ओल्या नारळाची चविष्ट खीर, कमी वेळात - मेहनत न घेता झटपट खीर होईल रेडी
आलं
लसणाच्या पाकळ्या
कोथिंबीर
लाल तिखट
हळद
ओवा
मीठ
पांढरे तीळ
बेसन
तांदुळाचं पीठ
ज्वारीचं पीठ
तेल
कृती
सर्वप्रथम, कोबी किसणीने किसून घ्या. कोबी किसून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे धणे, एक टेबलस्पून जिरं, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या घालून जाडसर पेस्ट तयार करा. त्यात पाणी घालण्याची आवश्यकता नाही. व तयार पेस्ट किसलेल्या कोबीवर घालून मिक्स करा. नंतर त्यात एक कप चिरलेली कोथिंबीर, एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद, चमचाभर ओवा, चवीनुसार मीठ आणि २ टेबलस्पून पांढरे तीळ घालून साहित्य हाताने एकजीव करा.
वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी, नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ करायलाही सोपा, टिकतेही जास्त दिवस
साहित्य एकजीव केल्यानंतर त्यात अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदुळाचं पीठ आणि एक वाटी जवारीचं पीठ घालून घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर एक चमचा तेल घाला. व हे तेल तयार पिठावर अलगद हाताने पसरवा. एक मोठी चाळणी घ्या, त्यावर एक चमचा तेल घालून ग्रीस करा. हातावर तेल लावा, नंतर पीठाचे गोलाकारात रोल तयार करा. व तयार रोल चाळणीवर ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर चाळणी ठेवा. व चाळणी पूर्ण झाकली जाईल, असे झाकण ठेवा. मध्यम आचेवर १५ मिनिटांपर्यंत वड्या वाफवून घ्या. वड्या वाफवून झाल्यानंतर बाजूला काढून ठेवा. थंड झाल्यानंतर सुरीने वड्याचे काप तयार करा.
कोबीची वडी डब्यात फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवल्यास आठवडाभर आरामात टिकतात. जेव्हा खायची इच्छा होईल, तेव्हा खरपूस तेलात तळून, कोबीच्या वड्यांचा आस्वाद घ्यावा.