Lokmat Sakhi >Food > कोजागरी पौर्णिमा : फक्त १० मिनिटांत दूध मसाला-विकतच्या महागड्या मसाल्यापेक्षा चविष्ट आणि सुगंध

कोजागरी पौर्णिमा : फक्त १० मिनिटांत दूध मसाला-विकतच्या महागड्या मसाल्यापेक्षा चविष्ट आणि सुगंध

Kojagari Pornima Special Masala dudh home made masala recipe : बाजारात मिळणारा विविध कंपन्यांचा मसाला खूप महाग तर असतोच पण त्यात कसली भेसळ असेल तर सांगता येत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 11:21 AM2024-10-15T11:21:47+5:302024-10-15T18:10:49+5:30

Kojagari Pornima Special Masala dudh home made masala recipe : बाजारात मिळणारा विविध कंपन्यांचा मसाला खूप महाग तर असतोच पण त्यात कसली भेसळ असेल तर सांगता येत नाही.

Kojagari Pornima Special Masala dudh home made masala recipe : Instead of bringing expensive milk masala, make it at home -milk will get perfect flavor. | कोजागरी पौर्णिमा : फक्त १० मिनिटांत दूध मसाला-विकतच्या महागड्या मसाल्यापेक्षा चविष्ट आणि सुगंध

कोजागरी पौर्णिमा : फक्त १० मिनिटांत दूध मसाला-विकतच्या महागड्या मसाल्यापेक्षा चविष्ट आणि सुगंध

कोजागरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा आपल्याकडे अतिशय उत्साहात साजरी केली जाते. चंद्राची पूजा करुन गरम दुधामध्ये त्याचे प्रतिबिंब पाहून तेच दूध प्रसाद म्हणून घेणे याला या दिवशी विशेष महत्त्व असते. चंद्रासारखी शितलता आपल्यामध्ये यावी असा भावही त्यामागे असतो. यानिमित्ताने कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येतात आणि कधी गाण्याची मैफल तर कधी जेवणाचा बेत असे रंगते. यावेळी आपण आवर्जून सगळ्यांसाठी मसाला दूध करतो. हे मसाला दूध करायचे म्हणजे त्यासाठीचा मसाला आणायला हवा (Kojagari Pornima Special Masala dudh home made masala recipe). 

बाजारात मिळणारा विविध कंपन्यांचा मसाला खूप महाग तर असतोच पण त्यात कसली भेसळ असेल तर सांगता येत नाही. त्यापेक्षा घरच्या घरी हा मसाला केला तर तो स्वस्त पडतो आणि पौष्टिकही होतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे दूध घेऊ शकतात. हा मसाला करायलाही अगदी सोपा असतो. घरात किमान सुकामेवा असेल तर तो करायला फार वेळ लागत नाही. म्हणूनच पाहूयात घरच्या घरी मसाला दुधाचा मसाला कसा करायचा. 

मसाला करण्याची पारंपरिक पद्धत... 

(Image : Google)
(Image : Google)

१. सुकामेवा म्हणजे आपल्याला आवडतात आणि घरात उपलब्ध असतील ते नटस गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायचे. यामध्ये मुख्यत: काजू, पिस्ता आणि बदाम घ्यावेत. याशिवाय आक्रोड, सूर्यफुलाच्या किंवा भोपळ्याच्या बिया असं काहीही घेऊ शकतो. हा सुकामेवा मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगला भाजून घ्यावा, नंतर थंड करण्यासाठी एका ताटलीत काढून ठेवावा. 

२. त्यानंतर वेलची, जायफळ, बडीशेप आणि साखर एकत्र करुन त्याची मिक्सरवर एकदम बारीक पूड करुन घ्यावी. ही पूड एका वाटीत काढून ठेवावी.

३. आता भाजलेला सुकामेवा गार झाला असेल तर तो मिक्सरमध्ये घालून त्याचीही पूड करुन घ्यावी. ही पूड आवडत असल्यास थोडी ओबडधोबड ठेवली तरी चालते. पण लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती घरात असतील तर आपण ही पूड पूर्ण बारीक केली तरी चालते.

(Image : Google)
(Image : Google)

४. बारीक केलेला सुकामेवा आणि आधी केलेली जायफळ-वेलचीची पावडर एकत्र करुन त्यामध्ये ४ ते ५ काड्या केशर घालावे. हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे म्हणजे कोरडा दूध मसाला तयार होतो.हा मसाला एका कोरड्या आणि हवाबंद डबीत भरुन ठेवावा. 

५. हा मसाला आपण कोजागरीच्या दुधासाठी तर वापरु शकतोच पण एरवीही मुलांना दूध देताना त्यात हा मसाला घातल्यास दूध छान लागते. एक कप दुधासाठी साधारण एक टेबलस्पून मसाला असं प्रमाण घ्यायला हवं. दुधात मसाला घातल्यानंतर हे दूध पुन्हा एकदा चांगले गरम करावे. म्हणजे त्याचा दुधात छान फ्लेवर येतो. 

Web Title: Kojagari Pornima Special Masala dudh home made masala recipe : Instead of bringing expensive milk masala, make it at home -milk will get perfect flavor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.