नवरात्री आणि दसरा संपला की अवघ्या काही दिवसांनी कोजागरी पौर्णिमा येते. संपूर्ण भारतात कोजागरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. परंतु सगळीकडेच कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Special Recipe : Masala Milk) साजरी करण्यामध्ये एक साम्य असते ते म्हणजे मसाला दूध. आपणही कोजागरी पौर्णिमा हा शब्द ऐकला की, आपल्यालाही पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे (Masala Doodh Recipe) मसाला दूध. मसाला दूध (Tasty & Thick Masala Milk) प्यायल्याशिवाय कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाऊच शकत नाही. कोजागरी पौर्णिमेला प्रत्येक घराघरांत आवर्जून पारंपरिक प्रथेनुसार मसाला दुधाचा बेत केला जातो. असे मसाला दूध बनवून रात्री उशिरा पर्यंत ते चंद्राच्या शितल छायेत ठेवले जाते, जेणेकरुन चंद्राची शीतलता त्यात उतरावी आणि ते आरोग्यदायी ठरावे(How to make Masala Milk).
प्रत्येक घरात मसाला दूध बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. परंतु असे असले तरीही हे मसाला दूध जितके घट्ट आणि दाटसर असेल तितकेच ते प्यायला चविष्ट आणि छान लागते. दूध तर आपण एरवीही पितोच पण कोजागरी निमित्त मसाला दूध पिण्याची मज्जा काही वेगळीच असते. छान दाटसर दूध त्यात ड्रायफ्रुट्सचे पातळ काप, हळद, केशर असे सगळे जिन्नस घालून रोजच्याच दुधाला शाही स्वरुप दिले जाते. कोजागरीसाठी खास बनवले जाणारे हे शाही मसाला दूध छान दाटसर, घट्ट असेल तरच ते चवीला उत्तम लागते. यासाठी यंदाच्या कोजागरी निमित्त (Kojagiri Pournima Special : Masala Milk) घरच्या घरीच छान दाटसर दूध बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करुयात(Kojagari Special : 6 easy quick options to make masala milk thicker, How to make masala milk thicker).
मसाला दूध दाटसर होण्यासाठी काही टिप्स :-
१. मिल्क पावडर :- कोजागरी निमित्त मसाला दूध बनवणार असाल तर ते छान दाटसर होण्यासाठी आपण त्यात मिल्क पावडर घालू शकतो. मसाला दूध बनवताना त्यात थोडीशी मिल्क पावडर घातल्याने दुधाला हलकाच दाटसरपणा येतो. बाजारांत विकत मिळणाऱ्या मिल्क पावडरचा आपण नक्कीच वापर करु शकता.
२. ड्रायफ्रूट्सचे काप :- मसाला दूध हे थोडे घट्ट, दाटसर असेल तरच ते प्यायला छान लागते. मसाला दुधात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप किंवा ड्रायफ्रूट्सची पावडर मिक्स केली तर दुधाला छान असे टेक्श्चर मिळून दाटपणा येतो.
३. दूध आटवून घ्यावे :- मसाला दूध बनविण्यासाठी दूध उकळायला ठेवा. दूध थोडे आटवले तर ते अधिक छान लागते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार दूध जेवढे पाहिजे तेवढे आटवून घ्या. पण खूप घट्ट रबडीप्रमाणे करू नका.
४. दुधावरची घट्ट साय :- दूध आणि दुधावरची साय यांचे एकप्रकारचे अनोखे नाते असते. जर आपण दुधावरची घट्ट साय दुधात घातली तर दुधाला स्वतःचा असा एक प्रकारचा दाट आणि घट्टसरपणा प्राप्त होतो.
मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...
५. फुल क्रिम दुधाचा वापर करा :- कोजागरी निमित्त मसाला दूध बनवताना ते अधिक दाटसर व्हावे यासाठी फुल क्रिम दुधाचा वापर करा. मसाला दूध अधिक चांगले दाटसर व घट्ट होण्यासाठी दुधात फॅट्सचे प्रमाण जास्त असलेले दूध विकत घेणे योग्य ठरेल. यासाठी टोन्ड दूध किंवा गाईच्या दुधाऐवजी फुल क्रिम किंवा फुल फॅट्स असलेले दूध घेतल्यास मसाला दुधाला एक प्रकारचा दाटसरपणा येईल.
६. दूध अशाप्रकारे उकळवा :- बहुतेकवेळा आपण फ्रिजमधून दूध काढून थेट उकळायला ठेवतो. परंतु असे केल्याने दुधातील साय चांगल्या प्रकारे बाहेर पडत नाही. त्यामुळे दूध लगेच फ्रिजमधून काढून उकळण्यास किंवा गरम करण्यास गॅसवर ठेवू नये. दूध उकळण्याआधी साधारण २० ते ३० मिनिटे सामान्य तापमानावर येऊ द्यावे. त्यानंतरच दूध गरम करण्यासाठी किंवा उकळवण्यासाठी गॅसवर ठेवावे. अशाप्रकारे दूध उकळवल्यास दुधावर जाड व घट्ट साय येण्यास मदत होते.