Lokmat Sakhi >Food > कोजागरी पौर्णिमा स्पेशल : कोजागरीला मसाला दुधासोबत करा ३ चविष्ट मेन्यू...कोजागरी होईल खास

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : कोजागरीला मसाला दुधासोबत करा ३ चविष्ट मेन्यू...कोजागरी होईल खास

Kojagiri Purnima 2022 : पाहूया कोजागरीला करता येतील असे ३ सोपे-झटपट पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2022 11:24 AM2022-10-09T11:24:33+5:302022-10-09T11:31:48+5:30

Kojagiri Purnima 2022 : पाहूया कोजागरीला करता येतील असे ३ सोपे-झटपट पदार्थ...

Kojagiri Poornima Special : Make Kojagiri Masala with milk 3 tasty menu...Kojagiri will be special | कोजागरी पौर्णिमा स्पेशल : कोजागरीला मसाला दुधासोबत करा ३ चविष्ट मेन्यू...कोजागरी होईल खास

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : कोजागरीला मसाला दुधासोबत करा ३ चविष्ट मेन्यू...कोजागरी होईल खास

Highlightsमसाला दूध पिणार असल्याने आधी थोडे स्पायसी खायला हरकत नाही. घरात झटपट होतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे मेन्यू करता येतील

कोजागरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा देशभरात अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. यादिवशी आवर्जून मसाला दूध केले जाते. पौर्णिमेच्या चंद्राला या दुधाचा नैवेद्य दाखवून त्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहून हे दूध प्रसाद म्हणून प्यायले जाते. मसाला दूध म्हणून दूध उकळून थोडे घट्टसर करुन त्यात सुकामेवा, केशर, वेलची पूड यांचा मसाला घातला जातो. रात्री झोपताना दूध पिण्याचे आरोग्याच्या दृष्टीने बरेच महत्त्व सांगितले आहे. कोजागरीच्या दिवशीही आवर्जून हे दूध घेतले जाते याचे महत्त्वाचे कारण ऋतूबदल होत असताना पित्त होण्याची शक्यता असते. या पित्ताचे शमन होण्यासाठी दूध पिणे अतिशय फायदेशीर ठरते. आता दूधाचा नैवेद्य ठिक आहे, पण त्यासोबत जेवायला काय करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पाहूया कोजागरीला करता येतील असे ३ सोपे मेन्यू (Kojagiri Purnima 2022)...

(Image : Google)
(Image : Google)

१. पावभाजी - गुलाबजाम

हा लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा मेन्यू आहे. घरात उपलब्ध असतील त्या भाज्या आणि फ्लॉवर, मटार आणि बटाटा, टोमॅटो, कांदा यांच्यापासून करता येणारी ही भाजी झटपट करता येते. गरमागरम भाजी आणि बटरवर भाजलेले लुसलुशीत पाव हा अतिशय छान मेन्यू होऊ शकतो. यासोबत तुम्ही दुलाबजाम, काला जामून असा बेत नक्की करु शकता. मसाला दूध थोडे गोड असल्याने त्यासोबत चमचमीत पावभाजी असेल तर तोंडाला छान चव येते. 

२. मसालेभात, जिलेबी आणि पापड

रात्रीच्या वेळी आपण साधारणपणे हलका आहार घेतो. अशावेळी भाताचा एखादा प्रकार असेल तरी आपले जेवण होते. गरमागरम मऊ मसालेभात त्यावर तूप आणि तळलेलेल पापड किंवा कुरडई हा बेत अगदीच सोपा आणि छान असतो. मसाला दूध पिऊन थोडे जागरण करायचे असल्याने हा हलका बेत आपण नक्कीच करु शकतो. या कॉम्बिनेशनसोबत जिलेबी ठेवल्यास ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठीही मस्त ट्रीट होऊ शकते. सगळ्यांना सहज खाता येईल, पचेल अशा या भातात तुम्ही तोंडली, फ्लॉवर, मटार, कोबी अशा घरात असतील त्या भाज्या घालू शकता. 

(Image : Google)
(Image : Google)

३. छोले-बटुरा किंवा छोले-पुरी

छोले हाही सगळ्यांना आवडणारा आणि अतिशय चविष्ट लागणारा प्रकार. छोले आदल्या दिवशी भिजत घालून ते कुकरला चांगले शिजवून ग्रेव्हीमध्ये केल्यास ते चविष्ट लागतात. त्यासोबत पुरी, बटुरा, जीरा राईस किंवा पुलाव असे काहीही चांगले लागते. यातले काही करायचे नसेल तर गरमागरम फुलके किंवा पोळीही छोल्यासोबत जमून जाते. मसाला दूध पिणार असल्याने आधी थोडे स्पायसी खायला हरकत नाही. यासोबत कांदा, काकडी, बीट, गाजर असे सलाडही नक्की ठेवू शकता. 

Web Title: Kojagiri Poornima Special : Make Kojagiri Masala with milk 3 tasty menu...Kojagiri will be special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.