Lokmat Sakhi >Food > कोजागरी पौर्णिमा स्पेशल : ‘मसाला दूध’ बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त ४ सोप्या स्टेप्स आणि कोजागरीसाठी व्हा रेडी...

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : ‘मसाला दूध’ बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त ४ सोप्या स्टेप्स आणि कोजागरीसाठी व्हा रेडी...

Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागरीला तर परफेक्ट मसाला दूध हवंच, जागरण करा आनंदाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 01:40 PM2023-10-26T13:40:23+5:302023-10-26T14:30:42+5:30

Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागरीला तर परफेक्ट मसाला दूध हवंच, जागरण करा आनंदाने...

Kojagiri Poornima Special Recipe Masala Doodh, Kojagiri Purnima Special Masala Milk Recipe | कोजागरी पौर्णिमा स्पेशल : ‘मसाला दूध’ बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त ४ सोप्या स्टेप्स आणि कोजागरीसाठी व्हा रेडी...

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : ‘मसाला दूध’ बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त ४ सोप्या स्टेप्स आणि कोजागरीसाठी व्हा रेडी...

कोजागरी पौर्णिमा (Kojagiri/Sharad Pournima Special Masala Doodh) हा सण मसाला दुधाशिवाय अपूर्णच आहे. कोजागरी पौर्णिमेला प्रत्येक घराघरांत आवर्जून पारंपरिक प्रथेनुसार मसाला दुधाचा बेत केला जातो. रात्री उशिरापर्यंत जागून चंद्राला मसाला दुधाचा (Home-made Masala Milk) नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. नंतर प्रसाद म्हणून हे दूध सर्वजण एकत्रित बसून पितात. सर्वजण एकत्रित बसून हा दूध पिण्याचा आनंद लुटणे याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांत हे गरमागरम मसाला दूध पिण्यात एक वेगळीच मजा असते(How to make masala milk)

दूधामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा आणि शरीराला आवश्यक पोषणतत्त्व मिळवून देणारे महत्वाचे गुणधर्म असतात. यामुळे दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. कोजागरीच्या रात्री चंद्र, चांदण्याची शीतलता शरीराला मिळावी म्हणून त्याच्या छायेखाली बसून दूध आटवून ते पिण्याचा सल्ला दिला जातो. काहीजण साखर, सुकामेवा, जायफळ, वेलची,केशर याचबरोबर खास तयार मिल्क मसाला (Homemade Doodh Masala Powder) टाकूनही हे मसाला दूध करतात. कोजागरी पौर्णिमा म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे मसाले दुधाने भरलेला ग्लास. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मसाले दुधाचा (How To Make Masala Milk Masala Doodh for kojagiri) आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने मसाला दूध बनवतात व त्याचा आस्वाद घेतात. कोजागरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Kojagiri Purnima Special Masala Milk Recipe).   

साहित्य :- 

मसाला दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. दूध - १ लिटर 
२. दुधाचा तयार करुन घेतलेला मसाला - २ ते ३ टेबलस्पून 
३. ड्रायफ्रुटसचे काप - २ टेबसलपून 
४. केसर - १० ते १२ काड्या 
५. साखर - १५० ग्रॅम 
६. हळद - १/२ टेबलस्पून 
७. ड्रायफ्रूट्स वापरुन तयार केलेला मसाला - २ ते ४ टेबलस्पून  

मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...

ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...

कृती :- 

१. एका भांड्यात दूध घेऊन ते मंद आचेवर गरम करत ठेवा. हे दूध मंद आचेवर ठेवून थोडेसे आटवून घ्यावे. दूध आटवून थोडेसे दाटसर झाल्यावर त्यात साखर घालावी. ही साखर हळुहळु चमच्याने ढवळून विरघळवून घ्यावी. 
 
२. त्यानंतर या दुधात हळद घालून हलकीशी उकळी येऊ द्यावी. त्यानंतर या दुधात तयार केलेला दुधाचा मसाला घालून घ्यावा. त्यानंतर हे दूध मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे उकळवून घ्यावे. 

३. दूध चांगले उकळवून घेतल्यानंतर त्यातील सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत चमच्याने दूध हळुहळु ढवळून घ्यावे. 

४. सगळ्यात शेवटी गॅस बंद करून यात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप व केसर घालून घ्यावेत. 

विकतच्या मेदूवड्याला असतो तसा गोल आकार जमत नाही ? २ झटपट ट्रिक्स, करा उडपीस्टाइल वडा...

आपले कोजागरी निमित्त गरमागरम स्पेशल मसाला दूध पिण्यासाठी तयार आहे. हे गरमागरम मसाला दूध आपण पिण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Kojagiri Poornima Special Recipe Masala Doodh, Kojagiri Purnima Special Masala Milk Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.