Join us  

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : करा एक कप तांदळाची खीर! जागरणासाठी मस्त सोपा सुटसुटीत आणि स्वादिष्ट बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 2:06 PM

Kojagiri Pournima Special : Sharad Purnima Rice Kheer Recipe : कोजागरीला मसाला दूध तर करतातच पण तांदळाची खीरही अनेकजण स्वीट डिश म्हणून करतात.

चंद्र आहे साक्षिला! म्हणत काही दिवसांवर कोजागरी पोर्णिमा येऊन ठेपली आहे. हिंदू सणानुसार अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा येते. या दिवशी दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. दूधात चंद्र पाहून व्रताची सांगता केली जाते. पण या दिवशी मसाला दुधासह खिरीचा नैवद्य देखील दाखवला जातो.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त आपण घरी तांदुळाची चविष्ट खीर तयार करू शकता. प्रत्येकाकडे तांदुळाची खीर विविध प्रकारची केली जाते. तांदुळाची खीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. अनेकदा खीर करताना प्रमाण चुकते किंवा खिरीत गोडवा कमी होतो. आपल्या जर परफेक्ट खीर तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Kojagiri Pournima Special : Sharad Purnima Rice Kheer Recipe).

तांदुळाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य

१०० ग्रॅम तांदूळ

एक लिटर दूध

शंभर ग्रॅम साखर

मळलेली कणिक लवकर काळपट-कडक होते? ३ सोप्या टिप्स, कणकेचा गोळा राहील अधिक काळ फ्रेश

तूप

एक चमचा वेलची पावडर

आठ ते दहा बारीक चिरलेले काजू, बदाम, अक्रोड, चिरोंजी

कृती

तांदुळाची खीर करण्यासाठी सर्वप्रथम, एक वाटी तांदुळात पाणी घालून २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. एका पातेल्यात एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून मिक्स करा. आपण तांदुळाची जाडसर पावडर तयार करून देखील दुधात मिक्स करू शकता. गॅस मध्यम आचेवर ठेवा, व सातत्याने चमच्याने ढवळत राहा. तांदूळ दुधात शिजल्यानंतर त्यात एक कप साखर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला काजू, बदाम, अक्रोड, चिरोंजी घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.

दह्यात मीठ घालून खावे की साखर घातलेले गोड दही खाणेच योग्य? कुणी-केव्हा-कसे खावे दही?

साहित्य मिक्स केल्यानंतर खीर ५ ते १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्या. जर दुधाला घट्टपणा जास्त आला असेल तर, त्यात आपण अर्धा कप पाणी मिक्स करू शकता. शेवटी वेलची पूड घाला. गॅस बंद करा. खीर थोडी थंड झाल्यानंतर तांदुळाच्या चविष्ट खिरीचा आस्वाद घ्या.

टॅग्स :कोजागिरीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.