Join us  

Kojagiri Purnima 2022 : कोजागरीला फक्त ५ मिनिटात करा चवदार, स्वादीष्ट मसाला दूध; या घ्या इस्टंट रेसेपीज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 2:01 PM

Kojagiri Purnima 2022 : दुधाला उकळी आली की त्यात मसाला घाला. केशराच्या काड्या थोड्या दूधात अर्धा तास भिजायला घाला आणि नंतर ते या पातेल्यात उकळणाऱ्या दुधात टाका.

कोजागरी पौर्णिमा (kojagiri purnima) म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे मसाला दूध. गप्पांची मैफिल आणि हातात सुगंधित दुधाचा कप. त्याची मजाच काही वेगळी. (Masala Milk Masala Doodh) मसाला दूध तयार करायला तसं सोप्पयं पण त्याची चव आणखी वाढवण्यासाठी दूधाचा मसाला तयार करण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी या लेखात मसाला दूध तयार करण्याच्या काही सोप्या रेसेपीज पाहूया (How To Make Masala Milk Masala Doodh for kojagiri)

मसाला दूध रेसेपी (Masala Doodh Recipe)

१) मसाला दूध बनविण्यासाठी सगळ्यात आधी दूध उकळायला ठेवा.

२) दूध थोडे आटवले तर ते अधिक छान लागते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार दूध जेवढे पाहिजे तेवढे आटवून घ्या. पण खूप घट्ट रबडीप्रमाणे करू नका.

३) उकळणारे दूध जर दोन कप असेल तर त्यात दोन चमचे साखर टाका.

४) साखर टाकल्यानंतर दूध आणखी ८ ते १० मिनिटे उकळू द्या. 

५) दूध उकळत असताना दुधाचा मसाला तयार करा.

६) मसाला तयार करण्यासाठी ८ ते १० अख्खे बदाम, १० ते १२ पिस्ते, ३ ते ४ विलायची मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पूड तयार करुन घ्या. आता यामध्ये जायफळ किसून घाला. जायफळ साधारण पाव टिस्पून घ्या.

७) जायफळाची पूड आपण तयार केलेल्या मसाल्यात टाका आणि पुन्हा सगळा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

८) दुधाला उकळी आली की त्यात मसाला घाला. केशराच्या काड्या थोड्या दूधात अर्धा तास भिजायला घाला आणि नंतर ते या पातेल्यात उकळणाऱ्या दुधात टाका. केशर टाकल्यानंतर काही वेळ दूध उकळू द्या. त्यामुळे केशराचा रंग आणि फ्लेवर दुधात छान मिसळला जाईल.  गरमागरम दूध कपात भरून सर्व्ह करा.

1) कोजागिरीला १० लोकांसाठी मसाला दूध बनवण्याची रेसेपी

२)

३)

४)

५)

टॅग्स :कोजागिरीदूधकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न