Lokmat Sakhi >Food > कोजागरी पौर्णिमेला केलं मसाला दूध उरलं? करा ३ भन्नाट पदार्थ, खाणारेही मागतील पुन्हा पुन्हा

कोजागरी पौर्णिमेला केलं मसाला दूध उरलं? करा ३ भन्नाट पदार्थ, खाणारेही मागतील पुन्हा पुन्हा

3 special sweet recipes of remaining masala doodh of kojagiri purnima cooking tips : राहिलेल्या दुधाचा असा वापर केला हे घरात कोणाला समजणारही नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 11:28 AM2024-10-17T11:28:07+5:302024-10-17T18:03:40+5:30

3 special sweet recipes of remaining masala doodh of kojagiri purnima cooking tips : राहिलेल्या दुधाचा असा वापर केला हे घरात कोणाला समजणारही नाही..

kojagiri Purnima cooking tips :Make 3 amazing dishes from the remaining masala milk of Kojagari, the eaters will also be very happy.. | कोजागरी पौर्णिमेला केलं मसाला दूध उरलं? करा ३ भन्नाट पदार्थ, खाणारेही मागतील पुन्हा पुन्हा

कोजागरी पौर्णिमेला केलं मसाला दूध उरलं? करा ३ भन्नाट पदार्थ, खाणारेही मागतील पुन्हा पुन्हा

कोजागरी पौर्णिमेला चंद्राचे प्रतिबिंब पाहून आपण दूध पितो. पण सगळे एकत्र आले असतील तर भरपूर खाणे होते. अशावेळी रात्रीचे गोड दूध खूप जास्त प्यायले जातेच असे नाही. एखादा कप दूध पिऊन झाल्यावर आपल्याला बास होते. मग हे मसाला दूध दुसऱ्या दिवशी तसेच उरुन राहते. गोडाचे दूध सतत पिणे सगळ्यांनाच आवडते असे नाही. अशावेळी याच दुधापासून काहीतरी छान पदार्थ केला तर आपल्याला तो अगदी सहज खाल्ला जातो आणि घरात कोणाच्या लक्षातही येत नाही. पूर्वी आजी-आई अशाच उरलेल्या गोष्टींपासून आपल्याला काही ना काही करुन द्यायच्या. त्याचप्रमाणे या राहिलेल्या दुधाचा चांगला वापरही होतो आणि नवीन पदार्थ केल्याचा आनंदही मिळतो. पाहूयात कोजागरीच्या राहीलेल्या दुधापासून करता येतील असे ३ चविष्ट पदार्थ कोणते (3 special sweet recipes of remaining masala doodh of kojagari purnima cooking tips).  

१. बासुंदी 

मसाला दूध गॅसवर ठेवून चांगले आटवायचे. त्याला घट्टपणा येण्यासाठी त्यात मिल्क पावडर नाहीतर बाजारात मिळणारे कंडेन्स्ड मिल्क घालायचे. यामुळे दुधाला घट्टपणा येतो आणि त्याला सायीसारखे जाडसर टेक्श्चर येण्यास मदत होते. असं काही करायचं नसेल तर पारंपरिक उपाय म्हणजे यामध्ये थोडा खवा किंवा मलाई पेढे कुस्करुन घातले तरी मस्त घट्टसर बासुंदी तयार होईल. ही बासुंदी पोळी, पुरीसोबत तर छान लागतेच पण थोडी गार करुन नुसतीही खायला छान लागते. नुसतं दूध पिण्यापेक्षा हा पर्याय अगदीच छान होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. शाही तुकडा 

ब्रेडचा वापर करुन केला जाणारा हा पदार्थ खायला खूपच छान लागतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही स्वीट डीश करायलाही सोपी असते. ब्रेडचा मधला भाग घेऊन त्यावर हे मसाला दूध घालून आटवायचे. आवडीनुसार यामध्ये जास्तीचा सुकामेवा, केशर, मिल्क पावडर असे घालू शकतो. पण झटपट होणारा आणि चवीष्ट लागणारा हा पदार्थ या निमित्ताने तुम्ही नक्कीच ट्राय करुन पाहू शकता. एरवी यामध्ये साधं दूध वापरलं जातं. पण कोजागरीचे मसाला दूध वापरले तर याला आणखी छान फ्लेवर यायला मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. खीर 

खीर हा गोडाचा पदार्थ आपल्याकडे सतत काही ना काही निमित्ताने केला जातो. कधी चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी, तर कधी विकेंडला अगदी सहज म्हणून खीर केली जाते. यामध्येही रव्याची, तांदळाची, शेवयांची अशा वेगवेगळ्या खिरी आपण करतो. खीर करण्यासाठी आपण जे साधं दूध वापरतो त्याऐवजी मसाला दूध वापरलं तर खीर नेहमीपेक्षा आणखी चविष्ट लागते. 
 

Web Title: kojagiri Purnima cooking tips :Make 3 amazing dishes from the remaining masala milk of Kojagari, the eaters will also be very happy..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.