पावभाजीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. विकतची बटर घातलेली पावभाजी खाण्याचा (Pav Bhaji Recipe) मोह आवरल जात नाही. कोजागरी पौर्णिमेला (kojagiri purnima 2023) मसाला दूधाची पार्टी करताना जर तुम्ही काही चमचमीत पदार्थ बनवण्याच्या विचारात असाल तर पावभाजी बनवू शकता. (How to make Street Style Pav Bhaji at Home)
घरातील माणसं असो किंवा सोसायटीच्या मंडळींसोबत पार्टी, पावभाजी खाऊन सगळेजण खूश होतील. (How to make restaurant style pav bhaji at home) हॉटेलस्टाईल तोंडाला पाणी सुटेल अशी पावभाजी तुम्ही घरच्याघरी बनवू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही अगदी कमीत कमी साहित्यात कमी वेळेत पावभाजी बनून तयार होईल. (Pav bhaji kashi banvaychi)
पावभाजी बनवण्याच्या सोप्या स्टेप्स (Pav Bhaji Recipe)
१) पावभाजी सगळ्यात आधी बनवण्यासाठी फोडणीसाठी दोन कांदे बारीक चिरून घ्या आणि कुकरमध्ये शिजवण्यासाठी २ कांद्यांचे मोठे काप करा. तीन ते चार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यानंतर शिमला मिरची बारीक चिरून घ्या. ८ ते १० लसूण सोलून घ्या. अर्धा इंच आलं किसून घ्या.
दुधावर पराठ्यासारखी घट्ट साय येईल; दूध गरम करताना ५ ट्रिक्स वापरा-दुधावर जाड मलई येईल
२) गॅसवर कुकर ठेवून त्यात बटर घाला. बटरबरोबर तेल घाला जेणेकरून बटर जळणार नाही. त्यात जीरं, कांदा, शिमला मिरची आणि लसूण घाला. कांदे गोल्ड होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. त्यात हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर आणि किसलेलं आलं घाला. हे मिश्रण एकजीव करून त्यात टोमॅटो घाला आणि १ टेबलस्पून मीठ घाला. सर्व पदार्थ एकजीव करून कुकरचं झाकण वरचेवर झाका.
३) ३- ४ मिनिटांनी झाकण काढून घ्या. नंतर मिश्रणाला तेल सुटू लागेल. यात बारीक चिरलेलं बीट, बारीक चिरलेलं गाजर, वाटीभर वाटाणे, ३ चिरलेले बटाटे आणि चिरलेले फ्लॉवर घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या जेणेकरून मसाला सर्व भाज्यांना लागेल.
१ जुडी पालकाच्या करा कुरकुरीत वड्या, खास पद्धत-पालक नको म्हणणारेही चवीने खातील पालक वडी
४) १ कप पाणी घालून झाकण घट्ट लावा. ४ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. कुकरमधील वाफ निघाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून पावभाजी मॅशरच्या मदतीने भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्या. यासाठी तुम्हाला ५ ते १० मिनिटं लागतील.
५) सर्व भाज्या व्यवस्थित बारीक झाल्यानंतर एका फोडणीच्या भांड्यात बटर घाला. बटरमध्ये बारीक चिरलेला कांदा घाला, त्यात पावभाजी मसाला घाला. ही फोडणी तयार भाजीच्या कुकरमध्ये घालून एकजीव करा. गॅस मंद आचेवर ठेवून त्यात काळी मिरी, कसुरी मेथी घाला. १ कप पाणी घालून भाजी २ ते ३ मिनिटांसाठी शिजू द्या. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तयार आहे गरमागरम पाव भाजी. बटर लावून भाजलेल्या पावांबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता.