Join us  

आंबट - गोड चवीचं करा थंडगार कोकम सरबत, कमी वेळात - झटपट सरबत रेडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 12:17 PM

Kokum Juice Recipe | Kokum Sharbat | Kokum Benefits शरीराला ठेवा हेल्दी कोकम ड्रिंकने कुल, पाहा झटपट सरबतची थंडगार कृती..

उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही न काही थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होत असते. उन्हात गेल्यानंतर आपल्या घश्यात कोरड पडते. ही कोरड फक्त पाण्याने भागली जात नाही. गरमीच्या मौसमात स्वतःला हायड्रेट व कुल ठेवायचं असेल तर, कोकम सरबतचा आस्वाद घ्या. कोकम फळामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळते. जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. फायबरयुक्त कोकम फळ हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी, आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक असतात.

यासंदर्भात, सेलिब्रिटी फिटनेस एक्स्पर्ट यास्मिन कराचीवाला सांगतात, ''कोकम सरबतचे अनेक फायदे आहेत. जसे की पचनसंस्था सुधारण्यास मदत, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅस्ट्रिक, पित्त दोष या समस्यांपासून आराम देते.'' चला तर मग या थंडा - थंडा कुल - कुल पेयाची कृती पाहूयात(Kokum Juice Recipe | Kokum Sharbat | Kokum Benefits).

कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारं साहित्य

कोकम

पुदिन्याची पाने

जिरे पूड

गूळ सिरप

विकत घेतानाच कसं ओळखायचं की काकडी कडू आहे की नाही?

काळे मीठ

पाणी

बर्फाचे तुकडे

कृती

सर्वप्रथम, कोकम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी कोकम मऊ झाल्यानंतर पाण्यात मॅश करा. व कोकमचा लगदा पिळून घ्या. आता तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात जिरं भाजून घ्या, व मिक्सरमध्ये त्याची पावडर वाटून घ्या.

उन्हाळ्यात करा नाचणीचे घावन, पौष्टिक नाचणी पोटासाठी थंड आणि घावन चविष्ट-लुसलुशीत

आता कोकमच्या पाण्यामध्ये पुदिन्याची बारीक चिरून घेतेलेली पाने, पाणी, जिरे पूड, काळे मीठ,  गूळ सिरप घालून मिक्स करा. व फ्रिजमध्ये काही वेळेसाठी थंड होण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे थंडगार कोकम सरबत पिण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स