सोलकढी म्हणजे ताकासाठी असलेला पर्याय (Solkadhi). ग्लासभर सोलकढी प्यायल्याने शरीराला गारवा तर मिळतोच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. मुख्य म्हणजे पचनक्रियाही सुधारते. जेवणानंतर अनेक हॉटेलमध्ये सोलकढी दिली जाते. पण घरात तयार करताना हॉटेलस्टाईल सोलकढी तयार होईलच असे नाही. सोलकढी तयार करण्यासाठी कोकम, खोबऱ्याचं दूध आणि काही साहित्यांची गरज भासते (Cooking Tips).
जर आपल्याला हॉटेलस्टाईल आंबट-गोड चवीची सोलकढी तयार करायची असले तर, ही रेसिपी एकदा फॉलो करून पाहाच. या टिप्समुळे सोलकढी परफेक्ट तयार होईल. ही सोलकढी आपण अशीच पिऊ शकता, किंवा भातासह देखील खाऊ शकता(kokum kadhi made with coconut milk-Kokani Style Recipe).
सोलकढी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य(How to make Solkadhi in Marathi)
खोबरं
कोकम
मीठ
धणे पूड
कडीपत्ता
हिरवी मिरची
कधी ‘चवळी फ्राय’ खाऊन पाहिलं आहे? १० मिनिटांत होणारी चमचमीत रेसिपी, विसराल नेहमीची उसळ
साखर
कोथिंबीर
अशा पद्धतीने तयार करा सोलकढी
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप किसलेलं ओलं खोबरं घाला. त्यात ५ ते ७ कडीपत्त्याची पानं, २ हिरव्या मिरच्या, २ लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि २ कप पाणी घालून साहित्य वाटून घ्या.
उन्हाळ्यात शरीराला गारवा देते कैरी-खोबऱ्याची चटकमटक चटणी; चवीला चटपटीत - करा ५ मिनिटात
आता एका बाऊलवर सुती कापड ठेवा, त्यात तयार वाटण ओतून गाळून घ्या. अशा प्रकारे खोबऱ्याचं दूध तयार होईल. आता एका वाटीमध्ये ५ ते ६ कोकम पाण्यामध्ये भिजत ठेवा. कोकमचं पाणी खोबऱ्याच्या दुधामध्ये ओतून मिक्स करा. कलरसाठी आपण बीटरूटचा रस घालू शकता. आता सोलकढी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये काही वेळासाठी ठेवा.
नंतर त्यात अर्धा चमचा धणे पूड, २ टेबलस्पून साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. अशा प्रकारे आंबट-गोड चवीची पौष्टीक सोलकढी पिण्यासाठी रेडी. आपण ही सोलकढी अशीच पिऊ शकता किंवा भातासह देखील खाऊ शकता.