Lokmat Sakhi >Food > अस्सल पारंपरिक चव - खा झणझणीत भडंग; १० मिनिटात कुरकुरीत भडंग करण्याची रेसिपी

अस्सल पारंपरिक चव - खा झणझणीत भडंग; १० मिनिटात कुरकुरीत भडंग करण्याची रेसिपी

Kolhapuri Bhadang Indian Snack Recipe : भडंग कोल्हापूरचे आवडतात ना, मग घरीच करा कोल्हापुरी चवीचे झणझणीत भडंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 07:53 PM2024-07-11T19:53:33+5:302024-07-11T19:54:54+5:30

Kolhapuri Bhadang Indian Snack Recipe : भडंग कोल्हापूरचे आवडतात ना, मग घरीच करा कोल्हापुरी चवीचे झणझणीत भडंग

Kolhapuri Bhadang Indian Snack Recipe | अस्सल पारंपरिक चव - खा झणझणीत भडंग; १० मिनिटात कुरकुरीत भडंग करण्याची रेसिपी

अस्सल पारंपरिक चव - खा झणझणीत भडंग; १० मिनिटात कुरकुरीत भडंग करण्याची रेसिपी

चमचमीत - झणझणीत म्हटलं की कोल्हापूर (Kolhapuri Bhadang). तेथील अनेक पदार्थ जगभरात फेमस आहेत. त्यातील एक म्हणजे भडंग. ज्याला आपण कुरमुऱ्याचा चिवडा देखील म्हणतो (Food). सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. गरमागरम चहासोबत, संध्याकाळची छोटी भूक भागवण्यासाठी काहीतरी मसालेदार, झणझणीत खावंसं वाटतं (Cooking Tips).

अशावेळी भडंग हा उत्तम पर्याय आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे भडंग उपलब्ध आहेत. पण घरगुती भडंगला तोड नाही. आपण घरातही भडंग तयार करू शकता. ते ही अस्सल कोल्हापुरी चवीचे भडंग. स्टोर करून ठेवल्यास भडंग आरामात महिनाभर टिकते. जर आपल्याला घरात झटपट भडंग तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा(Kolhapuri Bhadang Indian Snack Recipe).

कोल्हापुरी भडंग करण्यासाठी लागणारं साहित्य

कुरमुरे

फरसाण

लसूण

तेल

शेंगदाणे

चणा डाळ

नितीन गडकरींना आवडते टोमॅटोची झणझणीत चटणी; वाफेवर शिजवा - कमी तेलात ५ मिनिटात तयार

हिरवी मिरची

कडीपत्ता

मोहरी

जिरं

हळद

हिंग

भडंग मसाला

मीठ

लाल तिखट

भाजलेली चणा डाळ

कृती

सर्वात आधी, एका बाऊलमध्ये कुरमुरे घ्या. कुरमुरे चाळणीत चाळून घ्या. नंतर त्यात कोल्हापुरी फरसाण मिक्स करा. खलबत्यात ६ ते ७ लसणाच्या पाकळ्या घालून ठेचून घ्या. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ३ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात ठेचून घेतलेला लसूण घालून भाजून घ्या. भाजलेला लसूण कुरमुऱ्याच्या मिश्रणामध्ये घाला.

रेस्टॉरंटस्टाइल नूडल्स ते ही प्रेशर कुकरमध्ये? २ शिट्ट्यांमध्ये - अगदी १० मिनिटात चमचमीत नूडल्स रेडी

नंतर त्यात एक कप शेंगदाणे घाला. शेंगदाणे देखील तेलात भाजून घ्या, आणि  कुरमुऱ्याच्या मिश्रणात घाला. अशाच प्रकारे चणा डाळ, हिरवी मिरची, कडीपत्ता घालून भाजून घ्या, व कुरमुऱ्याच्या मिश्रणात घाला. नंतर फोडणी तयार करा. यासाठी तेलात एक चमचा मोहरी, जिरं, हळद, हिंग, भडंग मसाला, चवीनुसार मीठ, लाल तिखट घालून मसाले भाजून घ्या आणि तयार फोडणी कुरमुऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून सर्व साहित्य एकजीव करा.

आता मिक्सरच्या भांड्यात २ चमचे भाजलेले चणा डाळ घ्या. त्याची पावडर करून भडंगमध्ये घालून मिक्स करा. अशाप्रकारे झणझणीत कोल्हापुरी भडंग खाण्यासाठी रेडी. छोटी भूक भागवण्यासाठी हा पदार्थ बेस्ट आहे. 

Web Title: Kolhapuri Bhadang Indian Snack Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.