या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ देणं अनेकांना कठीण जाते. काहींना जेवायला देखील वेळ मिळत नाही. सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येकाचा शेड्यूल हा फिक्स असतो. सकाळी कामावर, शाळेवर जाण्याची घाई प्रत्येकाची असते. सकाळचा नाश्ता शरीरासाठी आवश्यक असतो. त्यामुळे आपण झटपट पदार्थ बनवायच्या मार्गी लागतो. आपण जर झटपट टेस्टी ब्रेकफास्ट सर्च करत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.
ही झटपट रेसिपी बटाटे आणि मैदापासून बनते. जर आपण आलू लवर असाल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. हिवाळ्यात सकाळी उठण्याचा त्रास तर होतोच जर सकाळी नाश्ता बनवण्याचा देखील कंटाळा आला असेल तर, कोरियन पोटॅटो जियोन ही रेसिपी बनवून पाहा. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात.
कोरियन पोटॅटो जियोन या रेसिपीला लागणारं साहित्य
२ बटाटे
मीठ
मैदा
तेल
कृती
स्टेप १ - सर्वप्रथम, बटाट्यांना चांगले धुवून घ्या. त्यांचे सालं काढून घ्या, व त्याला किसून घ्या. बटाटे चांगले किसून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. व त्यात मैदा आणि मीठ टाकून मिश्रण चांगले मिक्स करा.
स्टेप २ - एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याचे मिश्रण टाका, व चमच्याच्या सहाय्याने मिश्रणाला गोलाकार द्या. या पॅनकेकला दोन्ही बाजूने चांगले तळून घ्या. अशा प्रकारे सगळे पॅनकेक तळून घ्या.
स्टेप ३ - अशा प्रकारे कुरकुरीत क्रिस्पी कोरियन पोटॅटो जियोन खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी कोणत्याही सॉस अथवा चटणीसह खाऊ शकता.