वरण- भात, भाजी- पोळी असे ४ पदार्थ ताटात वाढून खऱ्या खवय्याचं कधीच पोट भरत नाही. हे पदार्थ कितीही उत्तम चवीचे झाले असले तरी त्यांच्या जोडीला तोंडी लावायला चटणी, लोणचं, कोशिंबीर पाहिजे असतेच. त्यातही उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात तर हमखास बहुतांश घरांमध्ये कोशिंबीर केलीच जाते. म्हणूनच आता त्याच त्या चवीची कोशिंबीर प्रत्येकवेळी खाण्यापेक्षा आपल्या कोशिंबीरीसारखीच असणारी पण चवीला आणि करायला थोडी वेगळी असणारी दाक्षिणात्य पद्धतीची कोसंबरी खाऊन पाहा (kosambari recipe). रेसिपी अगदी सोपी आहे..(how to make south indian style kosambari?)
कोसंबरी करण्याची रेसिपी
दाक्षिणात्य पद्धतीची कोसंबरी कशी करायची, याची रेसिपी smitadeoofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. कोसंबरी हा पदार्थ दक्षिण भारतात सण- समारंभाच्यावेळी हमखास केला जातो.
साहित्य
१ कप गाजर
१ कप काकडी
ताणतणाव कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा, तज्ज्ञ सांगतात स्ट्रेस, टेन्शन कमी होऊन व्हाल रिलॅक्स..
अर्धा कप बारीक चिरलेली कैरी
पाव कप मुगाची डाळ
१ बारीक चिरलेली लाल मिरची
कडिपत्त्याची ५ ते ६ पाने
फोडणीसाठी तेल, मोहरी आणि जिरे
चवीनुसार मीठ
अर्धा कप खोवलेलं नारळ
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
सगळ्यात आधी मुगाची डाळ स्वच्छ धुूवून घ्या आणि ३० ते ४० मिनिटे पाण्यात भिजवून घ्या.
यानंतर एका भांड्यात किसलेलं गाजर, किसलेली काकडी, बारीक चिरलेली कैरी, चिरलेली मिरची, खोवलेलं नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरेपूड असं सगळं एकत्र करा.
यामध्ये चवीनुसार मीठ टाका.
आता एका कढईमध्ये फोडणी करून घ्या आणि ही फोडणी भांड्यातल्या सगळ्या पदार्थांवर घाला. यानंतर सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून छान एकत्र करून घ्या. चवदार अशी काेसंबरी झाली तयार.
कैरीच्या ऐवजी लिंबू पिळले तरी चालेल.