Join us  

हॉटेलस्टाइल कुरकुरीत कोथिंबीर वडी घरी करायची आहे? वापरा १ सिक्रेट पदार्थ; वड्या होतील परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 10:00 AM

Kothimbir Vadi Recipe | Maharashtrian Snack Recipe : कुरकुरीत, खमंग कोथिंबीर वडी करण्याची सोपी रेसिपी

कोथिंबीर वडी सगळ्यांनाच खायला आवडते (Kothimbir vadi). सिझन कोणताही असो, घराघरात कोथिंबीर वडी केली जाते. पदार्थाची शोभा वाढवण्यासाठी शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह केली जाते (Cooking Tips). कोथिंबीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, जस्त, सेलेनियम, मॅंगनीज, सोडियम, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, थायामिन, यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात (Food).

कोथिंबीरीची आपण हमखास वडी करतो. पण मनासारखी वडी घरात तयार होत नाहीत. जर आपल्याला हॉटेल स्टाईल वडी करायची असेल तर, या पद्धतीने वडी करून पाहा. कमी वेळात कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार होतील(Kothimbir Vadi Recipe | Maharashtrian Snack Recipe).

कोथिंबीर वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोथिंबीर

लसूण

आलं

हिरवी मिरची

पांढरे तीळ

हळद

लाल तिखट

हिंग

मीठ

शेंगदाण्याचं कूट

कडीपत्त्याची खमंग चटणी; केस त्वचा आणि वजन घटवण्यास गुणकारी; पण चटणी करायची कशी?

जिरं

ओवा

तेल

साखर

पाणी

कृती

सर्वात आधी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्या. नंतर बारीक चिरूनही घ्या. खलबत्त्यात लसणाच्या पाकळ्या, आलं आणि हिरव्या मिरच्या ठेचून घ्या. चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये एक चमचा पांढरे तीळ, हळद, लाल तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात हिरवी मिरचीचं वाटण, शेंगदाण्याचं कूट, जिरं, ओवा, तेल आणिचवीनुसार साखर घालून मिक्स करा.

पावसाळ्यात कांदे सडतात - कोंब फुटतात? ३ जबरदस्त उपाय; घरातले कांदे खराब होणार नाही

नंतर त्यात ३ चमचे तांदुळाचे पीठ आणि एक वाटी बेसन घालून मिक्स करा. पाणी जास्त घालू नका. गरजेनुसार पाणी घाला. कारण जास्त पाणी घातल्याने वडी कुरकुरीत होत नाहीत. नंतर चाळणीला हात किंवा ब्रशने तेल लावा. त्यावर पिठाचा लांबट आकाराचा गोळा ठेवा. चाळण स्टीमरमध्ये ठेवा. वाफेवर २० मिनिटांसाठी वडी शिजवून घ्या.

२० मिनिटानंतर चाळण बाहेर काढा, थंड झाल्यानंतर वडी सुरीने कट करा. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात वडी सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या, व तळलेल्या वड्या एका प्लेटमध्ये काढा. अशाप्रकारे कुरकुरीत कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स