जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ओली, सुकी चटणी, पापड, लोणचं याचबरोबर भजी, वड्याही खाल्ल्या जातात. हिवाळ्यात सगळ्यात भाज्या स्वस्त मिळतात. १० ते २० रुपयांची कोथिंबीरीची जुडी वापरून खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वड्या तयार करता येतात. कोथिंबीर वड्या तुम्ही व्यवस्थित वाफवून घेतल्यानंतर फ्रीजमध्ये एक आठवड्यापर्यंत ठेवू शकता आणि लागतील तशा तळून घेऊ शकता. काहींना कोथिंबीर वड्या शेलो फ्राय केलेल्या जास्त आवडतात. (Kothimbir Vadi Recipe Step by Step Recipe Maharashtrian Snacks)
कोथिंबीरीच्या सेवनाचे फायदे (Kothimbir Vadi Recipe)
१) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोथिंबीर हा रामबाण उपाय मानला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोथिंबीर औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही! याच्या नियमित सेवनाने रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.
२) कोथिंबीर केवळ पोटाच्या समस्या दूर करण्यासाठीच फायदेशीर नाही, तर ते तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात. पोटदुखीसारख्या समस्या असल्यास अर्धा ग्लास पाण्यात धणे किंवा कोथिंबीर टाकून प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
३) कोथिंबीर केवळ पोटाच्या समस्या दूर करण्यासाठीच फायदेशीर नाही, तर ते तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. पोटदुखीसारख्या समस्या असल्यास अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे धणे टाकून प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
भात किंवा चपातीबरोबर खायला करा व्हेज कुर्मा; ही घ्या सोपी रेसेपी
४) कोथिंबीर तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर तर आहेच पण त्यामध्ये आयर्न देखील भरपूर आहे. त्यामुळे अॅनिमिया दूर करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. तसेच अँटी-ऑक्सिडंट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असल्याने धणे कॅन्सरपासूनही बचाव करते.