Lokmat Sakhi >Food > न वाफवता करा खमंग खुसखुशीत को‌थिंबीर वडी फक्त १५ मिनिटांत

न वाफवता करा खमंग खुसखुशीत को‌थिंबीर वडी फक्त १५ मिनिटांत

Kothimbir Vadi - Step by Step Recipe - Maharashtrian Snack कोथिंबीर वडी करण्याची सोपी पद्धत, झटपट कोथिंबीर वडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 05:45 PM2023-08-10T17:45:54+5:302023-08-10T17:51:37+5:30

Kothimbir Vadi - Step by Step Recipe - Maharashtrian Snack कोथिंबीर वडी करण्याची सोपी पद्धत, झटपट कोथिंबीर वडी

Kothimbir Vadi - Step by Step Recipe - Maharashtrian Snack | न वाफवता करा खमंग खुसखुशीत को‌थिंबीर वडी फक्त १५ मिनिटांत

न वाफवता करा खमंग खुसखुशीत को‌थिंबीर वडी फक्त १५ मिनिटांत

'वडी' हा प्रकार आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये महत्वाचा असतो. ताटात कोणती ना कोणती वडी असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच नाही. आतापर्यंत आपण कोथिंबीर वडी, पालक वडी, कांदा वडी, मेथी वडी खाऊन पाहिली असेल. वडी करण्याची प्रोसेस फार मोठी. भाजी चिरण्यापासून ते वाफवून - तळण्यापर्यंत वडी परफेक्ट तयार होत नाही. जर घरात पाहुणे आले असतील, व त्यांनी कोथिंबीर वडीची फर्माईश केली असेल, तर झटपट वडी तयार कशी कराल?

वडी कमी वेळात तयार करायची असेल, तर न वाफवता कोथिंबीर वडी करून पाहा. वाफवून न घेताही तिच चव वडीला येते. त्यामुळे न वाफवता, कमी वेळात, खुसखुशीत वडी तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Kothimbir Vadi - Step by Step Recipe - Maharashtrian Snack).

कोथिंबीर वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोथिंबीर

बेसन

मीठ

हळद

पाणी

कांद्याची झणझणीत चटणी करा, भाजी नसली तरी जेवण होईल पोटभर आणि चविष्ट

जिरं

मिरची - लसूण पेस्ट

लाल तिखट

धणे पूड

शेंगदाण्याचं कूट

तेल

कृती

सर्वप्रथम, कोथिंबीर निवडून स्वच्छ करून घ्या. पाण्यात धुतल्यानंतर कोथिंबीर थोडी सुकवून घ्या, त्यानंतर बारीक चिरून घ्या. दुसरीकडे एका बाउलमध्ये दीड कप बेसन पीठ घ्या, त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, व एक कप पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा.

गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात दोन चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, दोन चमचे मिरची - लसूण पेस्ट, एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धणे पूड घालून चमच्याने मिक्स करा. मसाल्यांचा सुगंध दरवळल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, व दोन चमचे शेंगदाण्यांचं कूट घालून सर्व साहित्य एकजीव करा.

गरमागरम इडली सांबार तर खाताच आता खाऊन पाहा इडली पकोडा, पावसाळ्यात खा नव्या पद्धतीची भजी

२ मिनिटं कोथिंबीर शिजवून घ्या. त्यानंतर त्यात बेसन पीठाचं बॅटर घालून मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करा. दुसरीकडे एका ताटाला तेल लावून ग्रीस करा. त्यावर तयार बॅटर ओतून एकसमान पसरवा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापून घ्या. आपण वड्यांना आपल्या आवडीनुसार आकार देऊ शकता. वड्या तळण्यासाठी कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार बॅटरची वडी घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे न वाफवता खमंग कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Kothimbir Vadi - Step by Step Recipe - Maharashtrian Snack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.