देशभरात कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) म्हणजे गोकुळाष्टमीचा (Golulashtami) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Dahi Kala Recipe) कृष्णाला दही, दूध असे पदार्थ प्रिय असल्यामुळे नैवेद्यासाठी दही, दूध, तूप, भात, साखर किंवा पोहे एकत्र करून सुंदर, चविष्ट असा नैवेदय तयार केला जातो. याला दही काला किंवा गोपाळकाला (Gopal Kala)असेही म्हटले जाते. हा नैवेद्य देवासमोर दाखवल्यानंतर घरातील सगळेजण या प्रसादाचा आस्वाद घेतात. (How To Make Dahikala)
दही काला करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Gopal Kala For Krushna Janmashtami)
१) भिजवलेले जाड पोहे -१ कप
२) लाह्या - १ कप
३) दही- २ कप
४) भाजलेली चण्याची डाळ - २ चमचे
५) तूप- २ चमचे
६) जीरं- अर्धा चमचा
७) मोहोरी- अर्धा चमचा
८) कढीपत्ता- १० ते १२
९) हिरव्या मिरच्या- २
१०) आल्याचा तुकडा - अर्धा इंच
११) साखर - ३ ते ४ चमचे
१२) मीठ - चवीनुसार
१३) कोथिंबीर- २ चमचे
१४) केळी -२
१५) काकडी -१
१६) डाळिंब- १
१७) सफरचंद - १
गोपाळकाला/दहीकाला बनवण्याची सोपी रेसिपी (Janmashtmi Naivedya Recipe)
डाळीला २० मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. पोहेसुद्धा पाण्यात भिजवून ठेवा. पोह्यातलं सगळं पाणी बाहेर काढून टाका. सगळी फळं छोट्या, छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवा. यात जीरं, राई, हिरवी मिरची, आलं तळून घ्या. कढीपत्ता आणि फुललेली चणा डाळ घालून ३ ते ४ मिनिटं भाजून घ्या. एका बाऊलमध्ये दही, पोहे, लाह्या आणि चिरलेली फळं, डाळीचे मिश्रण घाला त्यानंतर त्यात साखर आणि मीठ घाला. तयार आहे स्वादीष्ट गोपाळकाला.
कोथिंबीर आणि लिंबाचे लोणचं घालून व्यवस्थित मिसळा. हे सर्व पदार्थ मिसळल्यानंतर दहीकाला तयार होईल. तुम्हाला दही काल्यात इतके जिन्नस घालायचे नसतील तर तुम्ही भिजवलेले पोहे, दही, दूध, साखर, मध, डाळिंब घालून मिश्रण एकजीव करू शकता. असा दही कालासुद्धा चविष्ट लागतो.