उन्हाळ्यात अनेक जण पापड, कुरडई, लोणचे असे पदार्थ तयार करतात. हे पदार्थ वर्षभर टिकतात. या पदार्थांमुळे जेवणाची रंगत वाढते. पापडाप्रमाणे कुरकुरीत कुरड्याही जेवताना खाणं अनेकांना आवडतं. बहुतेक लोकं कुरडई तांदळाच्या पिठाच्या किंवा गव्हाच्या चिकापासून तयार करतात. कुरडई चवीला भन्नाट लागतात.
तळल्यानंतर कुरडई चौपटीने फुलतात. पण आपण कधी कुरडईची भाजी खाल्ली आहे का? कुरकुरीत कुरडई फक्त तळून खात नसून, त्याची भाजी देखील तयार करण्यात येते. जर आपल्याला कुरडईची भाजी खायची असेल तर, कांदा कुरडई ही भाजी ट्राय करून पाहा. ही भाजी कमी साहित्यात झटपट तयार होते(Kurdai Chi Bhaji - Marathi Recipe, Special Recipe for Monsoon).
कांदा कुरडई करण्यासाठी लागणारं साहित्य
कुरडई
कांदा
मोहरी
जिरं
पाटा-वरवंट्यावर वाटूनघाटून करा नारळाची केरळी चटणी, पारंपरिक भन्नाट चव
हिंग
कडीपत्ता
लसूण
हिरवी मिरची
मीठ
हळद
शेंगदाण्याचं कूट
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी घ्या, त्यात ४ ते ५ कुरड्या घालून भिजत ठेवा. दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे तेल घाला, नंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचे जिरं, अर्धा चमचा हिंग, ५ ते ६ कडीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला लसूण, घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात दोन बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, घालून साहित्य भाजून घ्या.
चपातीचा चिवडा; शिळ्या चपात्यांचा कुस्करा करण्याची कुरकुरीत रेसिपी, चविष्ट आणि झटपट
नंतर त्यात भिजलेली कुरडई घालून साहित्यात एकजीव करा. हाताने थोडं पाणी शिंपडून त्यावर झाकण झाका. ५ मिनिटांनंतर त्यावर शेंगदाण्याचं कूट, व कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे कांदा कुरडई खाण्यासाठी रेडी. आपण ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता.